Saturday, April 20, 2024

/

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीतील पात्रांना मोफत रंगभूषा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विधानसभेच्या निवडणुकीमुळे पुढे ढकलण्यात आलेली पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणूक मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाने आवाहन केल्याप्रमाणे यंदा शनिवार दि.27 रोजी तर परंपरेने वडगाव भागातील शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शुक्रवार दि. 26 रोजी निघणार आहे.

या चित्ररथ मिरवणुकीत शहर व उपनगरातील जवळपास 70 हून अधिक सार्वजनिक शिवजयंती मंडळाचे चित्ररथ सहभागी होतात यात सहभागी प्रमुख पात्रांची व इतर पात्रांची संख्याही भरपूर असते आणि त्यांना रंगभूषेसाठी कमीतकमी वेळ मिळतो या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने व समिती नेते रमाकांत कोंडूसकर यांच्या पुढाकाराने सहभागी सर्व पात्रांची मोफत रंगभूषा करण्यात येणार आहे.

तरी या चित्ररथ मिरवणुकीत सहभागी पात्रांची संख्या व अन्य माहितीसह महादेव पाटील (9481535528), सागर पाटील ( 9964777565) व विकास कलघटगी (9448470235) यांच्याशी दि.24 मे पर्यंत संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

टीप -रमाकांत कोंडूस्कर यांचे निवडणूक संपर्क कार्यालय (कै.संभाजीराव पाटील यांचे निवासस्थान खासबाग डबल रोड) येथे 26 मे वडगाव आणि 27 मे रोजी शहापूर व बेळगाव साठी दुपारी 2 ते 6 पर्यंत मोफत मेक अप (रंगभूषा) केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.