बेळगाव लाईव्ह : बेंगळुरू पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण मंडळाचे अध्यक्ष, आयएएस अधिकारी एन. जयराम यांची मुख्यमंत्र्यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचा आदेश सरकारने जारी केला आहे.
एन. जयराम यांचे बेळगावशी अतूट नाते असून बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी त्यांनी चार वर्षे सेवा पार पाडली आहे.
बेळगावच्या जिल्हाधिकारीपदी कार्यरत असताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन चांगली कामगिरी बजावली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक समस्येला त्यांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. एन. जयराम यांचे बेळगावशी असलेले हितसंबंध आगामी काळात जिल्ह्याच्या विकासासाठी फायदेशीर ठरतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.