Thursday, December 5, 2024

/

सीमाभागावर भाजप-काँग्रेस समान वर्चस्व!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह महाराष्ट्राचे लक्ष वेधलेल्या सीमाभागातील चार मतदार संघावर भाजप आणि काँग्रेसचे समान वर्चस्व प्रस्थापित झाले असून दोन जागांवर भाजप आणि दोन जागांवर काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे.

बेळगाव दक्षिण मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार अभय पाटील यांनी म. ए. समितीचे रमाकांत कोंडुसकर यांचा ११७६२ मतांनी पराभव केला आहे. तर खानापूर मतदार संघात भाजपचे विठ्ठल हलगेकर यांनी ९१२३७ इतके मताधिक्य घेत एकहाती विजय मिळविला आहे.

बेळगाव ग्रामीण मतदार संघात काँग्रेसने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले असून काँग्रेसच्या विद्यमान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी १०६५९० इतके सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजय नोंदविला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आर. एम. चौगुले यांना ४१२४७ मते तर भाजपचे नागेश मन्नोळकर यांना ५१०३९ मते मिळाली आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून परिचित असणाऱ्या उत्तर मतदार संघात देखील असिफ (राजू सेठ) यांनी केवळ ७००० मतांच्या फरकाने भाजपचे डॉ. रवी पाटील यांचा पराभव केला असून निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार राजू सेठ यांना ५१२२३ तर डॉ. रवी पाटील यांना ४९१४१ मते मिळाली आहेत.Counting

यमकनमर्डी मतदार संघात नेहमीच वरचष्मा असणाऱ्या सतीश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा एकहाती सत्ता स्थापन केली असून ९७८६७ मतांनी ते विजयी ठरले आहेत. यमकनमर्डी मतदार संघातून भाजपचे उमेदवार बसवराज हुंदरी हे पराभूत झाले आहेत.

उमेदवारी नाकारल्यामुळे भाजपाला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी आपल्या अथणी मतदार संघातून १२७६१५ इतक्या मतांनी बाजी मारून महेश कुमठळ्ळी यांचा पराभव केला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.