बेळगाव लाईव्ह : संपूर्ण राज्याचे लक्ष वेढलेल्या सीमाभागातील ग्रामीण, उत्तर, दक्षिण आणि खानापूर मतदार संघाच्या मतमोजणीची तिसरी फेरी सुरु असून ग्रामीण मतदार संघात काँग्रेसच्या लक्ष्मी हेब्बाळकर, उत्तर मतदार संघात भाजपचे रवी पाटील, खानापूर मतदार संघात भाजपचे विठ्ठल हलगेकर तर दक्षिण मतदार संघात भाजपचे अभय पाटील आघाडीवर आहेत.
दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीची तिसरी फेरी सुरु झाली असून पहिल्या दोन फेरीसह तिसऱ्या फेरीत देखील ११६०१ मतांनी अभय पाटील आघाडीवर आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रमाकांत कोंडुसकर हे ६४०३ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सध्या पाचवी फेरी सुरु असून पाचव्या फेरीत देखील अभय पाटील हे १९५५६ मतांनी आघाडीवर आहेत तर १०४४३ मतांनी दुसऱ्या क्रमांकावर रमाकांत कोंडुसकर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या प्रभावती चावडी आहेत.
पहिल्या दोन फेरीसह ग्रामीण मतदार संघात १२०० मतांनी तिसऱ्या फेरीत देखील लक्ष्मी हेब्बाळकर या आघाडीवर असून दुसऱ्या क्रमांकावर समितीचे आर. एम. चौगुले आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपचे नागेश मन्नोळकर आहेत.
खानापूर मतदार संघात पहिल्या दोन फेरीत काँग्रेसच्या अंजली निंबाळकर आघाडीवर होत्या तर तिसऱ्या फेरीत भाजपचे विठ्ठल हलगेकर हे आघाडीवर आहेत. तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसच्या अंजली निंबाळकर या दुसऱ्या क्रमांकावर तर समितीचे मुरलीधर पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.