सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष कार्य करत आहे. प्रत्येकाला सन्मान आणि संधी देण्यात आली आहे. मात्र तरीही जे कोणी पक्षाबाहेर जाण्याचा विचार करत असतील तर अखेर तो त्यांचा निर्णय असेल, असे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी स्पष्ट केले.
बेळगावमध्ये आज रविवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बेळगाव उत्तर मतदारसंघातील मीडिया सेंटरचा उद्घाटन समारंभ आज सकाळी सुधांशू त्रिवेदी यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच संधी आणि सन्मान दिला.
नव्यांना संधी देणे आवश्यक असते. त्यानुसारच पक्षश्रेष्ठींनी निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना उमेदवारी दिली. अशा वेळी बंडखोरीची भाषा करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे. त्यांना संधी दिली सन्मान दिला आता आणखी काय पाहिजे ? असा सवाल करून त्रिवेदी यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत कर्नाटक राज्यात राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती दिली.
डबल इंजन सरकारने कर्नाटक राज्यात सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. देशात कर्नाटक राज्यात परदेशी गुंतवणूक सर्वाधिक झाली आहे. सर्व जाती धर्मांना घेऊन भारतीय जनता पक्ष कार्य करत आहे. प्रत्येकाला सन्मान आणी संधी देत आहे. मात्र, तरीही जे कोणी पक्षाबाहेर जाण्याचा विचार करत आहेत.
अखेर तो त्यांचा निर्णय असेल असे ते म्हणाले. म्हादाई प्रकल्पाचा अहवाल लवकरच जाहीर होईल. त्याचे चांगले परिणाम कर्नाटकात दिसून येतील. असे सांगून काल शनिवारी रात्री प्रयागराज पोलिसांसमोर झालेले हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्याचे त्यांनी टाळले.