स्टार एअर लाईन्स या कंपनीची महाराष्ट्र आणि बेळगावसह उत्तर कर्नाटकातील अलीकडची असुविधाजनक विमान सेवा प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत असून त्यांच्यात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसांमध्ये स्टार एअरच्या बेळगाव -मुंबई, मुंबई -बेळगाव, बेळगाव -इंदोर, बेळगाव -सुरत अशा बऱ्याच विमान सेवा तांत्रिक कारण देत अचानक रद्द केल्या जात आहेत.
विमान सेवा शेवटच्या क्षणी अचानकपणे 11 रद्द केल्यामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप व त्रास सहन करावा लागत आहे. स्टार एअरची विमान सेवा बेळगाव विमान सुरू झाली असली तरी अचानकपणे विमान सेवा रद्द होण्याचं प्रमाण स्टार एअरचं वाढल आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे.
विमानाचा प्रवास लवकरात लवकर इच्छित स्थळी पोहोचता यावे यासाठी केला जातो. बऱ्याच प्रवाशांना कामानिमित्त मुंबईसह देशातील अन्य प्रमुख शहरांमध्ये अर्जंट अर्थात तातडीने पोहोचावयाचे असते. त्यामुळे अशा परिस्थितीत फ्लाइट्स अर्थात विमान फेऱ्या अचानकपणे रद्द केल्या जात आहेत. स्टार एअरच्या बाबतीत अलीकडे हा प्रकार वाढला आहे. परिणामी प्रवाशांना त्रास व कामातील नुकसान सहन करावे लागत आहे.
बेळगाव विमानतळावर तर गेल्या आठवड्याभरात दोनदा बेळगाव -मुंबई, अजमेर मार्गे बेळगाव – इंदोर अशा विमान सेवा अचानक रद्द केल्यामुळे नागरिकांना प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. स्टार एअर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आपली विमान सेवा पूर्ववत सुरळीत करावी अशी मागणी वाढत आहे.
स्टार एअर एअरलाइन्सने आपल्या विमान सेवा जरूर कराव्यात मात्र त्या पूर्वकल्पना न देता अचानक रद्द होणार नाहीत त्याची काळजी घ्यावी. अगोदरच बेळगाव विमानतळावरील विमान सेवा दुसरीकडे हुबळी वगैरे ठिकाणी वळविण्यात आले आहेत. त्यामुळे बेळगाव विमानतळावरील विमान सेवा कमी झाल्या आहेत यात भर म्हणून आता आहेत त्या विमानसेवा अचानक रद्द केल्या जात असल्यामुळे त्याचा फटका बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येला बसू लागला आहे.