काश्मीरमध्ये शांततापूर्ण वातावरण राखण्यासाठी मोठे योगदान देणारे लेफ्नंट कर्नल आदित्य दहिया (वय 45) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. त्यांनी 14 वर्षे 16 मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटमध्ये सेवा दिली होती.
ते बेळगावमध्येही अनेक वर्षे कार्यरत होते. आठ वषार्ंपासून ते प्रादेशिक सेनेमध्ये कार्यरत होते, अशी माहिती एमएलआयआरसीचे माजी जनसंपर्क अधिकारी कॅप्टन बिजेंदर सिंह यांनी दिली.