बेळगाव लाईव्ह : रविवार दि. २ एप्रिल रोजी दुपारी १.०० वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रिज) येथे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यात येणार आहे. याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांचे विचार जाणून घेऊन निवडणुकीसंदर्भात पुढील रणनीती ठरविण्यात येणार आहे. मागील काही बैठकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविण्यात आले असून उमेदवारांची निवड, विभागवार घटक समितीच्या कार्याची रूपरेषा तसेच कार्यकर्त्यांवर सोपविल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्या अशा अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात येणार येणार आहे.
या बैठकीला बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी, युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, महिला आघाडीचे कार्यकर्त्यांनी, वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.