Saturday, December 21, 2024

/

एकशे एक जणांची कमिटी 13एप्रिल रोजी उमेदवार होणार जाहीर

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगाव ग्रामीण मतदारसंघात विजयाचा झेंडा रोवण्याचा निश्चय केला आहे. त्यासाठी 101 जणांची निवड समिती सात एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवारांच्या अर्ज स्वीकारणार असून 13 एप्रिल रोजी उमेदवार घोषित करणार आहे कोणत्याही परिस्थितीत बंडखोरी होणार नाही यासाठी विशेष खबरदारी घेण्यात येईल असा निर्धार तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत करण्यात आला.

मराठा मंदिर सभागृहात रविवारी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वाची बैठक उपाध्यक्ष एडवोकेट राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत बेळगाव ग्रामीण मतदार संघात उमेदवार निवडीसाठी निवड समिती कशी असावी या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये विविध कार्यकर्त्यानी मनोगत व्यक्त केले. गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानावर आधारित कार्यकारिणी निवडण्यात यावी अशी मागणी बहुतांश कार्यकर्त्यांनी केली.

त्यानुसार बेळगाव ग्रामीण मतदार संघातील 108 गावात लोकसभा निवडणुकीच्या पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळालेल्या मतदानावर आधारित निवड समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही निवड समिती स्थापन करण्याचा अधिकार 11 जणांना देण्यात आला आहे. या अकरा जणांनी लोकसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला झालेल्या मतदानावर प्रत्येक गावातून निवड समितीवर सदस्य निवडण्यात येणार आहेत. 101 जणांची ही निवड समिती सात एप्रिल ते 13 एप्रिल पर्यंत जनमानसांचा कौल आजमावून उमेदवार निश्चित करणार आहे.Mes rural

या बैठकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिकाधिक कार्यकर्त्यांनी निवड समिती कमीत कमी लोकांच्या असावी आणि ती प्रामाणिक असावी त्यांनी निवडलेला उमेदवार कोणत्याही राष्ट्रीय पक्षाशी बांधील नसावा मराठी माणसांचे  हित जपणारा असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यानुसार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी दोन ते सात एप्रिल पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येतील. या अर्जावर  निर्णय घेण्यासाठी अकरा जणांची समिती लोकसभा पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानावर आधारित 101 जणांची निवड समिती स्थापन करून जनमानसांचा कौल घेतील आणि 13 एप्रिल रोजी उमेदवारी घोषित करण्यात येईल अशी माहिती दिली. मनोहर किनेकर यांच्या या घोषणेला सर्वांनी मान्यता दिली. या निवड समितीत महिला, ज्येष्ठ आणि युवकांचा सहLS