बेळगाव दक्षिण मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार फेरीला प्रारंभ झालेला असून आज मंगळवारी सकाळी शास्त्रीनगर, न्यू गुडशेड रोड, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड या ठिकाणी मोठ्या उत्साहात पदयात्रा काढण्यात आली. यावेळी कोंडुसकर यांचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत करून संपूर्ण पाठिंबा व्यक्त करण्यात आला.
आज सकाळी प्रारंभी नर्तिकी सिनेमागृहासमोरील गुडशेड रोड या ठिकाणी विविध मंडळांच्यावतीने सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष वेंकटेश शहापूरकर यांच्या हस्ते समिती उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण काळे , सुरेश माळीक, गोपाळराव हांडे, गणेश दड्डीकर, सुनील राव, विकास पाटील, कपिल भोसले, विजय बेळगावकर, सुधीर गोडसे व अर्जुन पाटील यांच्या हस्ते श्री रमाकांत कोंडुसकर यांचा सन्मान करण्यात आला.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी रोपट्याला पाणी घालून आणि स्वच्छतेचे महत्व पटवून देत प्रचार पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत स्वयंस्फूर्तीने नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गुडशेड रोडहून प्रारंभ झालेली ही प्रचार पदयात्रा न्यू गोडसे रोड शास्त्रीनगर सहावा क्रॉस पाटेदार भवन, संत सेना भवन, हुलबत्ती कॉलनी, एसपीएम रोड, महात्मा फुले रोड यासह विविध भागात गलोगल्ली काढण्यात आली. प्रत्येक ठिकाणी रमाकांत कोंडुसकर यांचे उत्साही स्वागत करण्यात आले. तसेच मोठ्या जल्लोषात घोषणाबाजीही करण्यात येत होती. महाराष्ट्र एकीकरण समितीचा विजय असो यासह वेगवेगळ्या घोषणा देण्यात येत होत्या.
बेळगाव सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी अस्मिता टिकवण्यासाठीच्या या घोषणांसह संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी पदयात्रेच्या मार्गावरील परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्ते आणि मतदारांनी भगवे फेटे बांधून आणि भगवे झेंडे उभारून संपूर्ण वातावरणात भगवेमय करून सोडले होते. गल्लो गल्ली प्रचार पदयात्रेच्या मार्गावरील घरांसमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्याचप्रमाणे फटाक्यांच्या आतषबाजीत रमाकांत कोंडुसकर यांचे जल्लोषी स्वागत करत मोठ्या प्रमाणात पाठिंबा व्यक्त करण्यात येत होता.
यावेळी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ एसपीएम रोड, न्यू गुड्स रोड, महात्मा फुले रोड गणेशोत्सव मंडळ, शास्त्रीनगर, आटले गुरुजी गणेशोत्सव मंडळ, लालबहादूर शास्त्री गणेशोत्सव मंडळ, शास्त्रीनगर शिवजयंती उत्सव मंडळ, गोडसे कॉलनी आदी मंडळांच्या फलकांसह अन्य सार्वजनिक फलकांवर रमाकांत कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा दिल्याचा मजकूर झळकत होता.
रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार पदयात्रेत माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक सुधा भातखंडे, माजी नगरसेवक अनिल पाटील, माया पाटील, मायी पाटील, महेश दड्डीकर, सुरेश मळीक, सागर पाटील, विशाल कंगराळकर, चंद्रकांत कोंडुसकर, अवधूत पाटील, गजानन भोसले, प्रा. एन. एम. शिंदे, अरविंद घाटगे, मनोहर देसाई, बंडू देसाई, आनंद आपटेकर, शंकर भातखंडे, सदा शिनोळकर, अरुण काळे, विनोद हंगरेकर, सचिन पाटील, प्रवीण पाटील, विशाल कंगराळकर, भरत नागरोळी, कपिल पाटील, कपिल भोसले आदींसह परिसरातील पंचमंडळी, महिला मंडळ आणि युवक मंडळाचे सदस्य सहभागी झाले होते.
*उद्याच्या पदयात्रेचे नियोजन*
उद्या बुधवार दि. 26 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजता छ. शिवाजी महाराज उद्यान शहापूर येथे पूजन करून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर होसुर, मठ गल्ली, तांबेडकर गल्ली, बसवाण गल्ली, ओमकारनगर, होसुर दलित वस्ती, नार्वेकर गल्ली, आचार गल्ली, बिच्चू गल्ली, संभाजी रोड, गाडे मार्ग, सराफ गल्ली, पवार गल्ली, बसवन गल्ली, टीचर्स कॉलनी, जोशी मळा, संभाजी रोड, खासबाग या ठिकाणी सकाळच्या सत्रात पदयात्रा काढली जाणार आहे.
दुपारच्या सत्रात सायंकाळी ठिक 5 वाजता खादरवाडी गावातून प्रचार पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर संपूर्ण पिरनवाडी गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधला जाणार आहे. हुंचेनट्टी , बाळगट्टी गावात पदयात्रा काढली जाणार आहे. तरी मराठी भाषेकाने पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभाग दर्शवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.