Sunday, December 29, 2024

/

शहापूरात घुमला मराठीचा बुलंद आवाज : कोंडुसकर यांना प्रचंड पाठिंबा

 belgaum

बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार समाजसेवक रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ काल मंगळवारी सायंकाळी 5 वाजता महात्मा फुले रोड येथील बॅंक ऑफ इंडिया येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. महात्मा फुले रोड येथून बुरजाई गल्ली, कोरे गल्लीतील मधल्या मार्गाने मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळ गल्ली, कोरे गल्ली, भोज गल्ली, मेलगे गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, पी. के. क्वाटर्स मार्गे बॅ.नाथ पै चोकापर्यंत काढण्यात आलेल्या या प्रचार पदयात्रेदरम्यान कोंडुसकर यांना प्रचंड पाठिंबा व्यक्त झाला.

यावेळी प्रारंभी माजी महापौर महेश नाईक, माजी नगरसेवक अनिल पाटील, माजी नगरसेवक राकेश पलंगे, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, समाजसेविका शिवानी पाटील, युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर त्यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन व पुष्पहार घालून दक्षिणचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.

फटाक्यांच्या आतषबाजीत हे जल्लोषी स्वागत करण्यात आले. पदयात्रेच्या मार्गावर सर्वत्र मराठी संस्कृती परंपरा जतन करण्यात आली होती. स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांनी भगव्या पताका, भगवे फेटे, भगवे झेंडे आणि ताल मृदंगच्या गजरात विठ्ठलाचा गजर या माध्यमातून प्रचार फेरी एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली होती. घराघरात गल्ली गल्लीच्या कोपऱ्यावर समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांचे उत्स्फूर्त स्वागत करून आरती ओवाळून औक्षण करण्यात आले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कोंडुसकर भरघोस मतांनी निवडून यावेत यासाठी प्रत्येकाने कार्य करावे यासाठी यावेळी जनजागृती करण्यात आली.

याप्रसंगी मोहन पाटील , विजय भोसले, प्रशांत भातकांडे, विजय बिर्जे, अभिजीत मजूकर, गजानन शहापूरकर, शिवाजीराव हावळानाचे, सुनील बोकडे, विराज मुरकुंबी, शिवराज पाटील, सचिन केळवेकर, संतोष कृष्णाचे, श्रीकांत कदम, आप्पाजी काकतकर, संजय पाटील, वैभव कामत, प्रमोद गावडोजी, सागर पाटील, विशाल कंग्राळकर, शेखर तलवार, महेश भोसले, श्याम कोडुस्कर, शांताराम होसुरकर, संतोष शिवनगर, विशाल कंगराळकर, प्रा. आनंद आपटेकर, प्रा. एन. एन. आणि शिंदे सागर पाटील यांनी पदयात्रेनिमित्त शहापूर भागातील प्रत्येक गल्ली गल्लीत घराघरात जागृती अभियान राबविले. मतदान जागृती करण्यासंदर्भात मोहीम आखून कार्य केले. वरील सर्वांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसावर अत्याचार करण्याचा प्रयत्न शहापूर भागात भागात पुन्हा पुन्हा होतो आहे. त्याला उत्तर देण्यासाठी त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना वेळीच जागा दाखवण्यासंदर्भात आबाल वृद्ध आणि महिलांमध्ये जागृती करण्यात आली.Shahapur

शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणाऱ्या माणसाला वेळीच धडा शिकवायला हवा. अन्यथा गोरगरिबांबरोबर सर्वसामान्यांचे जगणे कठीण होईल हे लक्षात घेऊन मराठी माणसाने समितीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणले पाहिजे. तसे झाले नाही तर मराठी बोलायला सुद्धा दिले जाणार नाही. यासाठी मराठी माणसाने जागे झाले पाहिजे आणि वेळीच अशा लोकांना धडा शिकवला पाहिजेत तरच आपण मराठी म्हणून स्वाभिमानाने जगू शकू अन्यथा शकणार नाही याची दखल घेणे काळाची गरज बनलेली आहे.

बेळगाव मधील अनेक नामांकित जुन्या मराठी शाळा बंद पाडण्याचाही घाट घालण्यात आला आहे. तो घाट हाणून पाडण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने पेटून उठायला हवे. तरच आपले मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी अस्मिता, मराठी शाळा आणि महाविद्यालय टिकतील हे युवा पिढीने समजून घेणे गरजेचे आहे. मराठी भाषिकांनी एकत्र येऊन एकजुटीने एक जिद्दीने म. ए. समितीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणायलाच हवे तरच आपली अस्मिता टिकणारा अन्यथा टिकणार नाही. याची दखल तमाम मराठी बांधवांनी घ्यायला हवी घराघरात चुलीपर्यंत मराठी भाषेसाठी कार्य करायला हवे. तरच आपली संस्कृती टिकणार आहे. प्रेशर कुकर, साड्या, कुडते, ड्रेस, दारू, मटण, पैसे या आमिषांना बळी न पडता विरोधकांना प्रत्युत्तर दिले पाहिजे. गोरगरीब जनतेला सुखी करण्यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मराठी शाळा वाचवण्यासाठी भाषा टिकवण्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीला विजयी करायला हवे. सर्व सामान्यांच्या हक्कासाठी आपण लढणार आहोत असे भान लक्षात ठेवून महिलांनी कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता अधिकृत समितीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून द्या. आपली संस्कृती टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्या. या पद्धतीने माहिती देऊन विनंती करत रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचार पदयात्रेदरम्यान जनजागृती करण्यात येत आहे. पदयात्रेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारी सदस्य, हितचिंतक आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.