कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि उत्तर कर्नाटकातला भाजपचा एक मोठा नेतृत्व असलेले जगदीश शेट्टर भाजपला रामराम करणार आहेत.शेट्टर हे भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा देणार आहेत.
आमदारकी बरोबरच शेट्टर यांनी विधान सभेचे विरोधी पक्ष नेते,मंत्री ,मुख्यमंत्री आणि विधान सभेचे स्पीकर आदी पदावर काम केले होते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी यांनी स्वतः मुख्यमंत्री बसवराज बोम्मई धर्मेंद्र प्रधान आणि प्रहलाद जोशी यांनी रात्री उशिरा शेट्टर यांची भेट घेऊन मनधरणी करण्याचे प्रयत्न केले होते.
राजकीय सूत्रांनी बेळगाव live ला दिलेल्या माहिती नुसार भाजप नेत्यांनी शेट्टर कुटुंबियातील कोणत्याही एका सदस्याला उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली तसेच जगदीश शेट्टर यांना कोणत्याही राज्याचा राज्यपाल किंवा राज्यसभा सदस्य किंवा पक्षात राष्ट्रीय स्तरावर कोणतीही जबाबदारी देण्याचा प्रस्ताव दिला होता वरील तिन्ही प्रस्ताव नाकारून माझ्याच कुटुंबियातील सदस्याला उमेदवारी द्यायला तयार आहात तर मलाच का उमेदवारी देत नाही असा प्रश्न केला असल्याची माहिती मिळाली आहे.
त्यावर पक्षाने तुम्हाला सर्व पदे दिली आहेत तीन पदे देण्याचा प्रस्ताव दिला होता परंतु सर्व ऑफर धुडकावल्याने पक्ष श्रेष्ठींनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
आता सोमवारी स्पिकरांची भेट घेऊन आमदारकी आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देणार आहेत.
जगदीश शेट्टर हे दिवंगत रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे व्याही विद्यमान खासदार मंगला अंगडी मुलीचे सासरे आहेत त्यामुळे शेट्टर यांनी जर भाजपला सोडचिट्टी दिली तर अंगडी यांच्या बाबत 2024 निवडणुकीत काय होईल याची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.