कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज सोमवारी शेवटच्या दिवसाखेर बेळगाव जिल्ह्यातील 18 मतदार संघातील अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांपैकी एकूण 47 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघातील चित्र स्पष्ट झाले असून आता 185 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज सोमवार अंतिम दिवस होता. निवडणुकीसाठी गेल्या 13 ते 20 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील 360 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी छाननीत काही अर्ज अवैध ठरल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसाखेर जिल्ह्यातील एकूण 47 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे बेळगाव उत्तर मतदारसंघात 15 उमेदवार, बेळगाव दक्षिण मतदार संघात 8, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 12, खानापूर मतदार संघात 13 तर यमकनमर्डी मतदारसंघात 5 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत. उमेदवारी माघारीनंतर निवडणूक रिंगणात एकूण अंतीम 185 उमेदवार शिल्लक राहिले असून यामध्ये 172 पुरुष आणि 13 महिला उमेदवारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये निवडणूक रिंगणात शिल्लक असलेल्या एकूण उमेदवारांची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.
*निपाणी* : माघार -3, रिंगणातील उमेदवार -10, भाजप 1, काँग्रेस 1, आप 1, निजद 1, आरयुपीपी 2, स्वतंत्र 4, (पुरुष 8, महिला 2). *चिक्कोडी -सदलगा* : माघार -2, रिंगणातील उमेदवार -11, भाजप 1, काँग्रेस 1, आप 1, निजद 1, बीएसपी -1, आरयुपीपी 4, स्वतंत्र 2, (पुरुष 11). *अथणी* : माघार -1, रिंगणातील उमेदवार -13, भाजप 1, काँग्रेस 1, आप 1, निजद 1, आरयुपीपी 4, स्वतंत्र 5, (पुरुष 13). *कागवाड* : माघार -0, रिंगणातील उमेदवार -11, भाजप 1, काँग्रेस 1, आप 1, बीएसपी -1, निजद 1, आरयुपीपी 3, स्वतंत्र 3, (पुरुष 8, महिला 2). *कुडची (एससी)* : माघार -3, रिंगणातील उमेदवार -7, भाजप 1, काँग्रेस 1, आप -0, बीएसपी -1, निजद 1, आरयुपीपी 2, स्वतंत्र 1, (पुरुष 7). *रायबाग (एससी)* : माघार -3, रिंगणातील उमेदवार -8, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -0, निजद -0, आरयुपीपी 1, स्वतंत्र 4, (पुरुष 8). *हुक्केरी* : माघार -2, रिंगणातील उमेदवार -7, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -1, निजद -1, आरयुपीपी 1, स्वतंत्र 1, (पुरुष 7). *अरभावी* : माघार -1, रिंगणातील उमेदवार -13, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -1, निजद -1, आरयुपीपी 2, स्वतंत्र 6, (पुरुष 12, महिला 1). *गोकाक* : माघार -6, रिंगणातील उमेदवार -10, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -1, निजद -0, आरयुपीपी 3, स्वतंत्र 3, (पुरुष 10).
*यमकनमर्डी* (एसटी) : माघार -2, रिंगणातील उमेदवार -5, भाजप 1, काँग्रेस 1, आप -0, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी 0, स्वतंत्र 2, (पुरुष 5). *बेळगाव उत्तर* : माघार -2, रिंगणातील उमेदवार -15, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी -4, स्वतंत्र -7, (पुरुष 14, महिला 1). *बेळगाव दक्षिण* : माघार -2, रिंगणातील उमेदवार -8, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी -1, स्वतंत्र -3, (पुरुष 7, महिला 1). *बेळगाव ग्रामीण* : माघार -3, रिंगणातील उमेदवार -12, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -1, निजद -1, आरयुपीपी -2, स्वतंत्र -5, (पुरुष 9, महिला 3). *खानापूर* : माघार -3, रिंगणातील उमेदवार -13, भाजप 1, काँग्रेस 1, आप -0, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी -3, स्वतंत्र -7, (पुरुष 12, महिला 1). *कित्तूर* : माघार -2, रिंगणातील उमेदवार -10, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी -4, स्वतंत्र -2, (पुरुष 9, महिला 1). *बैलहोंगल* : माघार -4, रिंगणातील उमेदवार -9, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी -4, स्वतंत्र -1, (पुरुष 9). *सौंदत्ती यल्लमा* : माघार -0, रिंगणातील उमेदवार -10, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -0, निजद -1, आरयुपीपी -2, स्वतंत्र -4, (पुरुष 9, महिला 1). *रामदुर्ग* : माघार -8, रिंगणातील उमेदवार -13, भाजप 1, काँग्रेस 1, आप -1, बीएसपी -1, निजद -1, आरयुपीपी -1, स्वतंत्र -7, (पुरुष 11, महिला 2).
निवडणुकीसाठी गेल्या 13 ते 20 एप्रिल या कालावधीत निपाणी मतदारसंघात 17 पुरुष व 6 महिला अशा एकूण 23 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. या पद्धतीने चिक्कोडी सदलगा : 18 पुरुष 2 महिला एकूण -20 उमेदवार, अथणी : एकूण 20 पुरुष उमेदवार, कागवाड : एकूण 13 उमेदवार. कुडची एससी : 12 पुरुष 3 महिला एकूण 15 उमेदवार, रायबाग एससी : 14 पुरुष 1 महिला एकूण 15 उमेदवार. हुक्केरी : एकूण 20 पुरुष उमेदवार. अरभावी : 18 पुरुष 1 महिला एकूण 19 उमेदवार. गोकाक: एकूण 28 पुरुष उमेदवार, यमकणमर्डी : 10 पुरुष 2 महिला एकूण 12 उमेदवार, बेळगाव उत्तर : 25 पुरुष 2 महिला एकूण 27 उमेदवार, बेळगाव दक्षिण : 16 पुरुष 2 महिला एकूण 18 उमेदवार, बेळगाव ग्रामीण : 16 पुरुष 7 महिला एकूण 23 उमेदवार, खानापूर 23 पुरुष 1 महिला एकूण 24 उमेदवार, कित्तूर : 17 पुरुष 2 महिला एकूण 19 उमेदवार, बैलहोंगल : एकूण 19 पुरुष उमेदवार, सौंदत्ती यल्लमा : 14 पुरुष 2 महिला एकूण 16 उमेदवार आणि रामदुर्ग 25 पुरुष 4 महिला एकूण 29 उमेदवार या पद्धतीने जिल्ह्यातील 18 मतदारसंघांमध्ये 325 पुरुष आणि 35 महिला अशा एकूण 360 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते.