माजी मंत्री व कित्तूरचे आमदार डी. बी. इनामदार यांचे आज मंगळवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजारामुळे निधन झाले.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून फुफ्फुस आणि यकृताच्या विकाराने त्रस्त असलेल्या इनामदार यांच्यावर बेंगलोर येथील मणिपाल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचाराचा फायदा न होता आज सकाळी त्यांचे निधन झाले. नेगिनहाळ या त्यांच्या मूळगावी उद्या बुधवार दि. 26 रोजी दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे.
डी. बी. इनामदार हे आजतागायत त्यांनी नऊ वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या त्यामध्ये 5 वेळा विजय संपादन करून ते आमदार म्हणून निवडून आले होते.
राणी शुगर्स या सहकारी साखर कारखान्याचे ते बरीच वर्षे चेअरमन होते. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून जनतेतूनही दुःख व्यक्त होत आहे.