कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांकडून होणारे प्रचार, जाहीर सभा, ध्वनिक्षेपकांचा वापर, प्रचार कार्यालयांचा प्रारंभ आदींच्या परवानगीसाठी अर्ज करावा लागणार असून सदर परवानगीसाठी इच्छुक उमेदवाराला किंवा त्याच्या प्रतिनिधीला 48 तास आधी हा अर्ज करावा लागेल. त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती देखील निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे.
निवडणूक विभागाकडून जाहीर करण्यात आलेला कागदपत्रांचा तपशील पुढील प्रमाणे आहे. *सभेत ध्वनीक्षेपकांसाठीची कागदपत्रे* : 1) उमेदवार किंवा एजंट यांचे ओळखपत्र, पक्षाच्या लेटरहेडवर सर्व माहिती लिहिणे. 2) स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना हरकत दाखला (एनओसी).
3 ) सीटीसी, आरटीसी, खाता उतारा. 4) खुली जागा किंवा इमारत असल्यास त्या मालकाचे संमती पत्र. 5) पोलीस ठाण्याकडून ना हरकत दाखला (एनओसी). 6) खर्चाचा तपशील देणे. 7) ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधी पोलीस निरीक्षकांकडून न हरकत दाखला.
*प्रचार कार्यालयासाठी कागदपत्रे* : 1) उमेदवार किंवा एजंट यांचे ओळखपत्र, पक्षाच्या लेटरहेडवर सर्व माहिती लिहिणे. 2) स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना हरकत दाखला. 3) प्रचार कार्यालय सुरू केलेले ठिकाण, सार्वजनिक किंवा खाजगी मालमत्तेवर अतिक्रमण केलेले नाही याबाबतचे प्रमाणपत्र. 4) धार्मिक स्थळ, शिक्षण संस्था, रुग्णालय यांच्या शेजारी कार्यालय सुरू होणार नाही याचे प्रमाणपत्र, 5) मतदान केंद्रापासून किमान 200 मीटर पुढे कार्यालय असेल याचे प्रमाणपत्र, 6) सीटीसी, आरटीसी, खाता उतारा, 7) भाडे करार पत्र (बॉण्ड), 8) पोलीस ठाण्याचा ना हरकत दाखला, 9) खर्चाचा तपशील देणे, 10) ध्वनिक्षेपक वापर संबंधीचे पोलीस निरीक्षकांकडून ना हरकत दाखला.
*प्रचारासाठी वाहनाची परवानगी* : 1) उमेदवार किंवा एजंट यांचे ओळखपत्र, पक्षाच्या लेटरहेडवर सर्व माहिती लिहिणे. 2) प्रादेशिक परिवहन खात्याचे ना हरकत पत्र, 3) आरसी बुकची प्रत, वाहन चालक परवाना, मोबाईल क्रमांक, 4) वाहनाचे विमा प्रमाणपत्र, 5) वाहनाचे वाहन धूर तपासणी पत्र, 6) वाहन भाडेकरारवर असल्यास मालकाचे संमती पत्र आणि माहिती, 7) खर्चाचा तपशील देणे, 8) ध्वनिक्षेपक वापरासंबंधीचे पोलीस निरीक्षकांकडून ना हरकत पत्र.
*ध्वनीक्षेपकासह प्रचार फेरीसाठी कागदपत्रे* : 1) उमेदवार किंवा एजंट यांचे ओळखपत्र, पक्षाच्या लेटरहेडवर सर्व माहिती लिहिणे. 2) स्थानिक स्वराज्य संस्थांचा ना हरकत दाखला, 3) खर्चाचा तपशील देणे, 4) ध्वनिक्षेपक वापरासंबंधीचे पोलीस निरीक्षकांकडून ना हरकत पत्र.
*ध्वनिक्षेपकसहित कोपरा सभा* : 1) उमेदवार किंवा एजंट यांचे ओळखपत्र, पक्षाच्या लेटरहेडवर सर्व माहिती लिहिणे. 2) स्थानिक स्वराज्य संस्था यांचा ना हरकत दाखला, 3) खर्चाचा तपशील देणे 4) ध्वनिक्षेपक वापरा संबंधीचे पोलीस निरीक्षकांकडून ना हरकत पत्र.