केंद्रीय निवडणूक आयोगाने येत्या विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत स्वतःसोबत रोख रक्कम आणि भेटवस्तू घेऊन जाण्यासंदर्भातील मार्गदर्शक सूची जारी केली आहे.
त्यानुसार 50,000 रुपयांहून अधिक रोख रक्कम अथवा 10,000 रुपयांवरील किंमतीच्या भेटवस्तू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे त्यासंबंधीची वैध कागदपत्रे असली पाहिजेत. रोख रक्कम जर 50,000 पेक्षा कमी असेल तर कागदपत्राची आवश्यकता नसणार आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात स्पष्टीकरण नसलेली अव्यक्त अशी 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली जाईल आणि निवडणुकीशी तिचा कांही संबंध नसल्याचे सिद्ध झाल्यानंतरच ती परत केली जाईल. एखाद्याकडून 10 लाखापेक्षा अधिक रक्कम जप्त करण्यात आल्यास ती रक्कम आयकर खात्याकडे वर्ग केली जाईल.
तेंव्हा पुढील गुंतागुंत त्रास टाळण्यासाठी संबंधितांनी बँकेतून पैसे काढलेले असल्यास पासबुक स्वतः सोबत ठेवावे. खाजगी व्यक्ती आणि व्यावसायिकांनी सोबत नेत असलेल्या पैशाचा कायदेशीर स्रोत आणि अंतिम वापराच्या माहितीसह त
निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त पैसे सोबत घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला त्या पैशाचा स्त्रोत आणि ठिकाणाची माहिती देता आली पाहिजे. आढळून आलेली रक्कम जर 10 लाखापेक्षा अधिक असेल तर आयकर खात्याला माहिती दिली जाईल आणि आवश्यक पुरावे सादर केल्यानंतरच ती रक्कम परत केली जाईल.
रोख रक्कम जर 50,000 पेक्षा कमी असेल तर कागदपत्राची आवश्यकता नसणार आहे. मतांकरिता लाच देण्यासाठी वापरण्याची शक्यता गृहीत धरून 50 हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम नियुक्त पथकांकडून जप्त केली यावी, अशी सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.