बेळगाव – निवडणूक प्रचारासाठी धार्मिक स्थळांचा वापर करायचा नाही, असा आदेश असतानाही दोन दिवसांपूर्वी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील एका मंदिरात सभा घेतल्याप्रकरणी, भाजपच्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार नागेश मनोळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या बसुर्ते येथील गणेश मंदिरात बुधवारी रात्री सभा घेण्यात आली होती. हे निवडणूक आयोगाच्या मार्गसूचीच्या विरोधात असल्याने गुरुवारी काकती पोलिसांनी चित्रा वाघ आणि नागेश मन्नोळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून घेतला आहे.
दरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महाराष्ट्रातील नेत्यांनी सीमा भागात मराठी मतदारसंघात समिती विरोधात प्रचार करू नये अशी मागणी केली आहे असे असताना समितीची मागणी धुडकावत चित्रा वाघ यांनी मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार सुरू केला आहे.