Tuesday, May 7, 2024

/

चिरमुरे… तूरमुरे-6

 belgaum

शिष्य : गुरुजी आज निवांत बसला आहात!
गुरुजी : अरे मी तुला निवांत दिसतो! पण आतली खळबळ तुला दिसत नाही!
शिष्य : गुरुजी, तुम्ही नेहमीच मला सांगता कि, माझ्या आत खळबळ सुरु आहे, विचारमंथन सुरु आहे, आतल्या आत तुम्ही चर्चा करता! कधीतरी मलाही त्या चर्चेत सहभागी करा म्हणजे मलाही ज्ञान मिळेल, चर्चा कशी करावी? विचारमंथन कसं करावं? एखाद्या विषयाशी कसं भिडावं?

गुरुजी : शिष्या हे सगळं स्वतःच्या ज्ञानाने शिकायचं असतं! प्रत्येकाचा एक भाग असतो! कोण दुसऱ्याशी चर्चा करून शिकतं! कोण मनन करून शिकतं! आत्मचिंतन करून शिकतं! कोण पेच लिहून काढतं! कोण त्याच्यासाठी वेगळा प्रयत्न करतं!
शिष्य : गुरुजी, ते ठीक आहे. आता मला सांगा, आपल्या संघटनेचे चार नवे खेळाडू यावर्षी मैदानात उतरलेत! आणि त्यांचं कसं काय तुम्हाला वाटतंय? हे नवखे खेळाडू आजमावल्यानंतर आपल्या संघटनेचं यश कसं असेल?

गुरुजी : अरे, ते नवखे असले तरीही संघटना मात्र जुनीच आहे ना! आणि त्याचबरोबर हा प्रश्न ६६ वर्षांपासून भिजत पडला आहे! यावर बरंच विचारमंथन नेहमीच होत असतं! जसं आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टीचा परिणाम आपोआप आजूबाजूच्या लोकांवर होतो तसा या लोकांवरही पडला आहे. त्याच्यात नावीन्य काहीच नाही!
शिष्य : गुरुजी, ग्रामीण मतदार संघात राष्ट्रीय पक्षांकडून भरपूर पैसे वाटप केले जाणार आहेत म्हणे? मग ग्रामीण मतदारसंघात जनता मात्र मराठी माणसाच्या पाठीशी दिसत आहे! तर मग ग्रामीणचं काय होणार गुरुजी? काय चाललंय ग्रामीणमध्ये?
गुरुजी : पैसा पहिल्यापासूनच वाटला जात आहे! पैशानं सगळंच विकत घेता येत असेल, पण पैशानं आत्मसन्मान विकत घेता येत नाही! लोकेच्छा विकत घेता येत नाही! लोक काही मागायला गेले नाहीत, ज्यांनी आणून दिलं ते लोकांनी ठेवून घेतलं! कुणी दिलेलं ठेवून घेतलं तर याचा अर्थ त्याच्या अधीन झाले असं नाही ना होत! आणि एक लक्षात घे, कि ज्यावेळी भ्रष्ट मार्गाने तुमच्याकडे व्यवहार केला जातो त्याला कोणताही शिष्टाचार लागू नसतो. ते जर गैरमार्गाने तुमच्याकडे येत असतील, तुम्हीही गैरमार्गाने त्यांना काही उत्तर दिलं तर काय हरकत आहे? आणि पापाला कोण धनी नसतो. त्यामुळे त्यांनी आपल्या पापाचे कर्म तुमच्या पदरात आणून टाकत असतील, तर त्या पापाच्या कर्माशी तुम्ही बांधील नाही! त्याच्याशी इमानदार असलं पाहिजे असंही काही नाही. तुमची बांधिलकी, तुमची निष्ठा आणि इमानदारी या प्रश्नाशी आहे आणि हा प्रश्न ६६ वर्षांपासून चालत आला आहे, आणि तो प्रत्येकाच्या मनात आहे. आणि त्याच्याशी बांधिलकी जपणारी हि लोकं आपल्याच लोकांच्या पाठीशी उभं राहतील, यात काही शंका नाही!
शिष्य : गुरुजी ग्रामीण मधल्या राजकीय द्वंद्वाच्या युद्धात आपल्या संघटनेच्या नेत्याचा निभाव कसा लागणार?
गुरुजी : दुसऱ्याच्या घरात आग पेटलेली आहे, आपण जमलंच तर पाणी टाकावं! नाहीतर लांबूनच बघावं! दुसरं काय करू शकतो??? त्या त्यांच्या अस्मिता आहेत! आपल्या थोडीच आहेत! त्याच्याशी आपला काय मतलब? आपला मतलब आपल्या संघटनेशी, आपल्या प्रश्नाशी आहे!

 belgaum

Chirmuri turmuri
शिष्य : गुरुजी, मग उत्तरची स्थिती काय आहे?
गुरुजी : अमरला यावेळी अमरपट्टा मिळणार यात शंकाच नाही. कारण तिथं अनिलला डावलल्यानं तिकडचा एक गट विशेषपणानं अमरच्या पाठीशी उभा राहील! आणि मराठीचा अमरपट्टा त्याच्या गळ्यात घातला जाईल यात शंका नाही! अमरने मात्र हि लढत मनापासून देणे गरजेचे आहे. मनात विजूबीशी वृत्ती असली पाहिजे! मी जिंकूच असा विश्वास पक्का केला कि विजयश्री नक्कीच त्यांच्या पाठीशी राहणार आहे!
शिष्य : पुढे काय मग गुरुजी? उर्वरित दोन मतदार संघाचं काय?
गुरुजी : दक्षिण तर आपलंच आहे! झाडांच्या गावाचं पूर्ण अवलोकन केलं पाहिजे! मैदानात तर लोकं उतरले आहेत. लढत तर काटाजोड आहे! प्रयत्न केला तर आपल्याकडेही यश येऊ शकतं! वत्सा, तू काय करतोयस?

शिष्य : गुरुजी मी सध्या घरीच बसून आहे!
गुरुजी : अरे जरा बाहेर पड. उघड्या डोळांनी लोकांच्याकडे जा आणि पहा. माहिती काढ! बघ प्रचाराच्या सभेत गेलं म्हणजेच आपण मोठा कार्यकर्ता असतो असं नाही! किंवा आपल्या प्रश्नासाठी काम करतो असं होत नाही! कोपऱ्यावर बसलेल्या चार लोकांच्यात गप्पा मारताना आपल्या प्रश्नाशी बांधिलकी, आपली लोकं, आपली संघटना आणि आपली एकजूट याविषयी बोलत राहिला कि तू हि संघटनेचा नामकीन कार्यकर्ता ठरशील, वत्सा, उठ आणि कामाला लाग!
शिष्य : धन्यवाद गुरुजी, उद्यापासून बेळगाव उत्तर, दक्षिण, ग्रामीण आणि खानापूर पिंजून काढतो आणि माहिती आणतो. त्यानंतर आपण बसून चिरमुरे खाऊया!

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.