राष्ट्रीय पक्षा कडून राजहंस गड येथे दोनदा छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले या घटनेच्या पार्श्वभमीवर बेळगाव तालुका आणि शहर समितीची संयुक्त अशी महत्वपूर्ण बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली आहे.
मराठा मंदिरात बुधवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या बैठकीत राजहंस गडावरील छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुध्दीकरण पाध्यपुजन सोहळ्याच्या आयोजना संदर्भात सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय पक्षांनी राजकारण करत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोनदा अनावरण केले आहे आगामी निवडणूक डोळ्या समोर ठेऊन मराठी मतांचे राजकारण करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांनी दोनदा अनावरण केल्याने शिवरायांचा अवमान झाला आहे यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे शुध्दीकरण आणि पाद्य पूजन केले जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लढ्याचे आराध्य दैवत आहेत. आमच्या दैवताला राजकारणासाठी वापर केला गेला हे आमच्यासाठी असहनिय आहे यासाठीच मराठा समाज शिव भक्त आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शिवरायांचे शुध्दीकरण केले जाणार आहे.बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन शहर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि तालुका समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केलं आहे
निवडणुकीच्या तोंडावर मराठी भाषिकांचे मते मिळवण्यासाठी आटापिटा लावलेल्या भाजप काँग्रेसला त्यांची जागा दाखवण्यासाठी समितीने हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे बोलले जात आहे.