मुख्यमंत्री म्हणून यंदाचा कार्यकाळ संपत आलेल्या बेळगावच्या बहुदा शेवटच्या बेळगाव दौऱ्यावर असणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी तीन थोर पुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण केले.
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात हलगा येथील सुवर्ण विधानसौध पश्चिम गेटसमोरील आवारात असलेल्या संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी कित्तूर चन्नम्मा आणि संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले.
बेळगाव पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी सुवर्ण विधानसभा प्रांगणात पुतळ्यांच्या कोनशीला अनावरण सोहळा पार पडला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यात दोन कोटी 55 लाख रुपये खर्च करून तीन महापुरुषांच्या पुतळ्यांचे निर्मिती करण्यात आली. त्या पुतळ्यांचे मंगळवारी अनावरण करण्यात आले.
यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी, विधानपरिषदेचे सभापती बसवराज होरट्टी , सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सी.सी.पाटील, मंत्री शशिकला जोल्ले, शंकर पाटील मुनेनाकोप्प, मुरुगेश निराणी आदी उपस्थित होते.
सुवर्ण विधानसौध प्रांगणात,वीरराणी कित्तूर चन्नम्मा डॉ. बी.आर. आंबेडकर,आणि संगोळी रायण्णा पुतळ्यांचे अनावरण* pic.twitter.com/X0qyrrLtKp
— Belgaumlive (@belgaumlive) March 28, 2023