Tuesday, December 24, 2024

/

विजयनगर येथे घरफोडी; 21 लाखाचा ऐवज लंपास

 belgaum

विजयनगर, हिंडलगा येथे चोरट्यांनी एका सेवानिवृत्त जवानाचे घर फोडून सुमारे 21 लाख रुपये किमतीचा सोन्या -चांदीचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.

विजयनगर, हिंडलगा येथील एमईएस कॉलनीतील सेवानिवृत्त जवान राजेंद्र वामन हळदणकर यांच्या घरी सदर चोरीचा प्रकार घडला आहे.

सदर चोरीचा प्रकार काल गुरुवारी उघडकीस आला असून चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरातील तिजोरीमध्ये असलेले सुमारे 21 लाख रुपये किमतीचे 400 ग्रॅम सोन्याचे आणि 1 किलो चांदीचे दागिने लांबविले आहेत.

घरमालक राजेंद्र हळदणकर सहकुटुंब परगावी गेल्याची संधी साधून चोरट्यांनी आपला डाव साधला. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वानपथक व ठसे तज्ञाना पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.