Wednesday, January 8, 2025

/

दिव्यांगांसाठी लायन्स क्लब आणि महावीर लिंब सेंटरतर्फे खुशखबर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : लायन्स क्लब ऑफ बेळगाव, ऑल इंडिया जैन युथ फेडरेशन, महावीर लिंब सेंटर हुबळी यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्हा परिसर आणि कोकणातील दिव्यांगांसाठी भव्य मोफत कृत्रिम पाय बसविण्याचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

गँगरीन, अपघात, सेप्टिक अशा कारणांमुळे ज्यांनी आपले पाय गमावले आहेत, अशा दिव्यांगांना त्यांच्या पायाच्या मापानुसार कृत्रिम पाय देण्यात येणार आहेत. इच्छुकांनी लायन्स क्लब ऑफ बेळगावचे अध्यक्ष रवींद्र काकती, संपर्क क्रमांक : ९९६४२४७१७१ किंवा ९८४५१४१५०१ या क्रमांकाशी संपर्क साधून २१ मार्च च्या आत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर अवयव निशुल्क देण्यात येणार असून यामुळे सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे वावरणे दिव्यांगांसाठी शक्य होणार आहे.Singhi mahendra

महावीर लिंब सेंटरच्यावतीने आजपर्यंत अनेक ठिकाणी अशा मोफत अवयव शिबिराचे आयोजन करण्यात आले असून कृत्रिम अवयवाच्या माध्यमातून सामान्य व्यक्तींप्रमाणेच सन्मानाने आणि आत्मविश्वासाने दिव्यांग व्यक्ती आयुष्य जगू शकतात.

बेळगाव परिसर आणि कोकणातील नागरिकांसाठी हि सुवर्णसंधी लायन्स क्लबच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली असून दिव्यांग व्यक्तींनी वरील क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.