रविवारी सकाळी बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील राजहंसगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 50 फूट उंच मूर्तीचा अनावरण सोहळा पार पडला.
या कार्यक्रमाला शिवाजी महाराजांचे १३वे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती, लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख आणि कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील उर्फ बंटी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अनावरणापूर्वी ढोल-ताशाच्या गजरात पालखी मिरवणूक आणि ध्वजारोहण करण्यात आले.श्रेय वादावरून भाजप आणि काँग्रेस मध्ये वाद सुरू झाला असून या छ्त्रपती शिवरायांच्या मूर्तीच्या उद्घाटना वरून राजकारण सुरू झाले आहे. रविवारी ग्रामीणच्या आमदारांनी दुसऱ्यांदा राजहंस गड विकास कामाचे उद्घाटन केले.
गेल्या २ मार्च रोजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी या मूर्तीचे अनावरण केले होते त्या अगोदरच ग्रामीण आमदारांनी ५मार्च रोजी हा उद्घाटन कार्यक्रम जाहीर केला होता. राजहंस गडाचा विकास कुणी केला यावरून भाजप आणि काँग्रेसच्या आमदार मध्ये श्रेय घेण्यासाठी जुंपली असताना निवडणुका डोळ्या समोर ठेऊन मते मिळवण्यासाठी महाराष्ट्राच्या नेत्यांना बोलावून अनावरण करत असल्याचा आरोप महाराष्ट्र एकीकरण समितीचे केला होता.या शिवाय महाराष्ट्र मधील नेत्यांनी बेळगावात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने केली होती मात्र विरोध झुगारत काँग्रेस नेते बेळगावात दाखल झाले त्यांनी उद्घाटन कार्यक्रमात सहभाग दर्शवला.
राजहंसगड किल्ल्याबद्दल –
येळळूर किल्ला मूळतः दख्खन प्रदेशातील प्राचीन राजघराण्या रट्टाने बांधला होता आणि नंतर विजापूरच्या असद खान लहरीने त्याचे दगडी बांधकाम केले. हे बेळगाव किल्ल्याची चौकीदार म्हणून काम करत होते, गोवा आणि कारवार भागातील शत्रूंना शोधण्यासाठी आणि त्यांना रोखण्यासाठी एक मोक्याचा सोयीचा बिंदू प्रदान करते. त्याच्या संपूर्ण इतिहासात, किल्ल्यावर अनेक शासकांचे नियंत्रण आहे, आणि तीन युद्धांचा सामना केला आहे:
पहिले सावनूरचे नवाब आणि पेशव्यांच्या दरम्यान, दुसरे टिपू सुलतान आणि पेशव्यांच्या सैन्यातील आणि तिसरे सैन्याच्या अधिकार्यांमध्ये. भीमगड किल्ला आणि राजहुनगड सैन्य. ब्रिटीश राजवटीत, किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुमारे 100 सैनिक होते.