Friday, March 29, 2024

/

या काळात राजहंस गडावर प्रवेश बंदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे दोनवेळा केलेले अनावरण आणि त्यानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झालेला दुग्धाभिषेक सोहळा यानंतर राजहंसगडावर जनतेला तात्पुरती प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. २१ मार्च ते ४ मे पर्यंत गडावर प्रवेश बंदी असून यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावला आहे.

राजहंस गडाच्या परिसरात सुरू असलेल्या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या रस्त्यावर ग्रॅनाइट स्टोन फरशी बसवल्या जाणार आहेत, जे काम पूर्ण होण्यासाठी १५ दिवसांचा वेळ आवश्यक आहे.

राजहंस गडावर सुरू असलेल्या पर्यटकांच्या वर्दळीमुळे दैनंदिन ओघाने हे काम पद्धतशीर आणि कार्यक्षमतेने पार पाडणे आव्हानात्मक बनले आहे. त्यामुळे विकासकामे कोणत्याही अडथळ्याविना पूर्ण व्हावीत यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रवेशबंदीमुळे काहींची गैरसोय होऊ शकते, मात्र नागरिकांनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

 

Notice rajhans gadh

या बंदी मुळे काहींची गैरसोय होऊ शकते, मात्र नागरिकांनी याबाबत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.राजहंस गड किल्ला परिसराच्या विकासासाठी विकास कामे होणे आवश्यक आहे.

राजहंस गडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या 36 फूट उंचीच्या कांस्य पुतळ्याचे उद्घाटन प्रथम भाजपने नंतर काँग्रेसने केले आणि नंतर समिती द्वारा शुद्धीकरण कार्यक्रम आयोजित केला गेला  होता ज्यात गडावर मोठी गर्दी झाली त्यामुळे नव्याने बसविण्यात आलेली शिव मूर्ती पाहण्यासाठी पर्यटकांची गडावर गर्दी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.