बेळगाव लाईव्ह : कणबर्गी चेकपोस्टवर नियमबाह्य पद्धतीने घेऊन जाण्यात येत असलेली ९ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
बेळगाव शहरातून अंकलगीकडे जाणाऱ्या कारमध्ये सदर रोकड सापडली असून या रक्कमेसंदर्भातील कोणतेही कागदपत्र तपासादरम्यान आढळून आले नाहीत. सदर रक्कम हि खासगी फायनान्स कंपनीची असल्याचे सांगण्यात आले.
परंतु रकमेबाबत योग्य कागदपत्रे उपलब्ध नसल्याने शिवाय मनी ट्रान्स्फरबाबत विहित एसओपीचेही पालन केले नसल्याचे तपासादरम्यान आढळून आले आहे.
त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून, नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हाधिकाऱ्यांनी चेकपोस्टवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.