Monday, February 3, 2025

/

सोमवारी वाहतूक मार्गात ‘असा’ बदल

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. २० मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा आणि कर्नाटकाचे राज्यपाल यांचा बेळगाव दौरा असल्याने बेळगावमधील विविध ठिकाणच्या वाहतूक सकाळी ११ ते दुपारी ३ यावेळेत मार्गात बदल करण्यात आला आहे.

१) सांबरा विमानतळावरून, सांबरा अंडर ब्रिज, मुंड्यांडी गॅरेज, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गे कनकदास सर्कल, लेकव्ह्यू हॉस्पिटल, नित्यानंद क्रॉस, अशोक स्तंभ, हॉटेल त्रिवेणी, संगोळी रायन्ना सर्कल, कोर्ट कंपाउंड, राणी चन्नम्मा चौक, गणेश मंदिर, क्लब रोड, विश्वेश्वरय्या नगर बाची क्रॉस सर्कल, गणेश मंदिर, क्लब रोड मार्गे सीपीएडला जाणाऱ्या नागरिकांसाठी हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. यासाठी नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करायचा आहे.

२) बेळगाव शहरात निपाणी, कोल्हापूर, अथणी, चिकोडी, संकेश्वर, यमकनमर्डी, काकती मार्गे खानापूर गोवा हिंडाल्को, बॉक्साइट रोड, फॉरेस्ट नाक, हिंडलगा गणेश मंदिर, गांधी सर्कल, शौर्य चौक, थिमय्या रोड, केंद्रीय विद्यालय क्रमांक २, शर्कत पार्क,इंडिपेडन्स रोड, फर्नांडिस रोड, नेल्सन रोड, मिलिटरी महादेव मंदिर, काँग्रेस रोड मार्गे पुढे जायचे आहे.

३) बेळगावहून निपाणी, कोल्हापूर,अथणी काकती मार्गे जाणाऱ्या वाहनांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ मार्गे कृष्णदेवराय सर्कल, हॉटेल रामदेव, केएलई हॉस्पिटल रोड, केएलई बायपासमार्गे पुढे जायचे आहे.

४) हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, हिरेबागेवाडी येथून गोवा आणि खानापूरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांनी आलारवाड ब्रिज, जुना पीबी रोड, पॅटसन शोरूम, वैभव हॉटेल, डबल रोड क्रॉस, बँक ऑफ इंडिया सर्कल, महात्मा फुले रोड, आरपीडी सर्कल, तिसरे रेल्वेगेट मार्गे प्रवास रेल्वे ओव्हर ब्रिज मार्गे पुढे जायचे आहे.

५) हुबळी, धारवाड, बैलहोंगल, सौंदत्ती, हिरेबागेवाडी मार्गे जाणार्या वाहनांनी जुन्या पीबी रोड मार्गे राष्ट्रीय महामार्गावरून पुढे जायचे आहे.Traffic diversion

६) वेंगुर्ला, सावंतवाडी, हिंडलगा सुळगा येथून राष्ट्रीय महामार्ग ४ कडे जाणार्‍या वाहनांना शहरात प्रवेश करण्यास प्रतिबंध आहे. हि वाहतूक फॉरेस्ट नाक्याजवळून बॉक्साईट रोड, हिंडाल्को अंडर ब्रिज मार्गे राष्ट्रीय महामार्ग ४ कडे वळविण्यात आली आहे.

७) विजापूर, बागलकोट, यरगट्टी, नेसरगी येथून बेळगाव शहराकडे येणाऱ्या वाहनांनी मारिहाळ पोलीस ठाण्याजवळून उजवीकडे वळण घेऊन सुळेभावी गावातून कणबर्गी रोड, कनकदास सर्कल, राष्ट्रीय महामार्ग ४, निसर्ग धाब्याजवळून केपीटीसीएल रोड मार्गे शहरात प्रवेश करावा.

८) बेळगाव शहरातून सांबरा, नेसरगी, यरगट्टी, बागलकोट, विजापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी बेळगाव-गोकाक राज्य महामार्गावरून प्रवास करून खनगाव क्रॉस, सुळेभावी मार्गे बागलकोट रस्त्याकडे मार्गक्रमण करायचे आहे.

९) २० मार्च रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेश बंदी राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.