महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना त्या योजनेला विरोध करण्याची कर्नाटक शासन हिम्मत कशी करतयं? असं संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात महाराष्ट्र सरकारला केला.
महाराष्ट्र विधान परिषद सभागृहात बोलताना महाराष्ट्राने सीमावासीय मराठी बांधवांना प्रदान केलेल्या आरोग्य योजनेला कर्नाटक शासन विरोध करत आहे. आम्ही आमच्या लोकांना योजना दिली असताना त्या योजनेला विरोध करण्याची कर्नाटक शासन हिम्मत कशी करतयं?
असा सवाल करून आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या की, सीमा भागातील मराठी बांधवांच्या आरोग्याची चिंताही महाराष्ट्र सरकारने करू नये का? आणि जेंव्हा दोन्ही ठिकाणी एकाच पक्षाचे सरकार आहे, तेंव्हा आपण इथून ठोस उत्तर दिले पाहिजे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची हिम्मत कशी होते हे बोलण्याची? आम्ही आमच्या जनतेला निधी देतोय, अजूनही सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे. ती जनता इकडची आहे की तिकडची अजून ठरलेले नाही.
आम्ही निधी देतोय ते त्यांच्या आरोग्यासाठी आहे असे नमूद करून कोणत्या अधिकारात कर्नाटकचे मुख्यमंत्री असे भाषा करू शकतात? महाराष्ट्र सरकारने यावर कर्नाटकाला जाब विचारला पाहिजे, असे आमदार डॉ. कायंदे म्हणाल्या.