जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधून कृष्णा स्पीच थेरपी अँड हियरिंग क्लिनिक बेळगावतर्फे येत्या शुक्रवार दि. 3 मार्च ते रविवार दि. 5 मार्च 2023 पर्यंत बेळगाव, गोकाक व चिक्कोडी या शहरांमध्ये मोफत कान (श्रवण) तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सदर शिबिरामध्ये कानाच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून कानाची श्रवण शक्ती मोजण्यात येणार आहे. याखेरीज ज्या रुग्णांची ऐकण्याची श्रवण क्षमता कमी आढळून येईल अशा रुग्णांना नामांकित कंपनीचे कानाचे मशीन श्रवण यंत्रे कमीत कमी माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हे शिबिर संपूर्णपणे मोफत असणार आहे. श्रवण यंत्रामध्ये बीटीई, आर.आय.सी., सी.आय.सी., आय.टी.सी. बॅटरी विरहित चार्जेबल अशा सर्व प्रकारच्या श्रवण यंत्रांवर एक दिवसासाठी खास सवलत देण्यात येणार आहे असे क्लिनिकच्या संयोजकांनी कळविले आहे.
बेळगाव येथील कृष्णा स्पीच थेरपी अँड हियरिंग क्लिनिक येथे शुक्रवारी 3 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. बेळगावचे क्लिनिक काकती वेस रोड येथील प्रसाद मेडिकल समोर व शारदा जम्बो झेरॉक्सच्या बाजूला आहे. गोकाक येथील क्लिनिकमध्ये शनिवारी 4 मार्च रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिर घेतले जाणार आहे. हे क्लिनिक बस स्टॅन्ड रोडला असून पुनर्वि ज्वेलर्सच्या बाजूला आहे.तसेच चिक्कोडी येथील क्लिनिकमध्ये रविवारी 5 मार्च रोजी सकाळी 10:30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत शिबिर होईल. हे क्लिनिक बस स्टॅन्ड शेजारी असून आर. डी. कॉलेज समोर आहे.
तरी सदर शिबिरांचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 9492853815 अथवा 8088559289 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.