बेळगाव लाईव्ह : बहुचर्चित राजहंसगड किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे आणि विकास कामांचे अनावरण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या उपस्थितीत पार पडले. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात ग्रामीण आमदारांनी मात्र अनुपस्थिती दर्शविल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.
पालकमंत्री गोविंद कारजोळ, माजी मंत्री रमेश जारकीहोळी, खासदार मंगल अंगडी, उत्तर मतदार संघाचे आमदार अनिल बेनके, जिल्हाधिकारी नितेश पाटील, प्रादेशिक आयुक्त महांतेश हिरेमठ आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
राजहंसगडावरील विकासकाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या अनावरण सोहळ्यावरून गेल्या पंधरा दिवसांपासून मोठे राजकारण सुरु होते. राजकारणातील कट्टर विरोधक रमेश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यात राजहंसगडावरील विकासकामाच्या श्रेयवादावरून शीतयुद्ध सुरु होते.
विकासकामासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिल्याने सदर कार्यक्रम शासकीय शिष्टाचार पाळून करण्यात यावा, असा अट्टाहास रमेश जारकीहोळींनी केला आणि अखेर आपला अट्टाहास सिद्ध करत त्यांनी आज शासकीय शिष्टाचारानुसार हा कार्यक्रम पार पडला.
आता ५ तारखेला ग्रामीण मतदार संघाच्या आमदार पुन्हा याठिकाणी कार्यक्रम करतील का? याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर दोन्ही राष्ट्रीय पक्ष राजकारण करत असल्याचा आरोपही होत आहे. शासकीय उद्घाटन कार्यक्रम घाई घाईने आटोपता घेतला.
राजहंसगडावरील कार्यक्रम शासकीय नियमानुसार पार! *ग्रामीण आमदारांची अनुपस्थिती!*https://t.co/D63rX7BZV4@BSBommai @Chh_Udayanraje pic.twitter.com/2RoQTmS4sh
— Belgaumlive (@belgaumlive) March 2, 2023