साहित्य संमेलन ही उपासना म्हणून बेळगांवमध्ये जिव्हाळ्याने जोपासतात. हेच बेळगावकरांनी मराठी भाषा टाकविली, सांस्कृतीक परंपरा, लोकपरंपरा, सीमा वेगवेगळया असल्या तरी भौगोलकदृष्ट्या वेगळ्या असतात; तर भाषिक आणि भावनिक दृष्टया या एकच असते. बेळगाव हे साहित्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आणि प्रोत्साहन देणारे शहर आणि सीमा भागामध्ये प्रयत्न करून जतन करण्यासाठी झटणारे हे बेळगाव शहर आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ अरुणा ढेरे यांनी मांडले.
बेळगाव येथील मराठा मंदिर छत्रपती शिवाजी महाराज नगरीत आज लविवारी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि मराठा मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानाने चौथे अखिल भारतीय बेळगाव मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी पुण्याच्या ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर अरुणा ढेरे उपस्थित होत्या.
एकविसाव्या शतकात महिलांना अनेक संधी प्राप्त झाल्या आहेत. मात्र तरीही दुसऱ्या बाजूला याच शतकात स्त्रीच्या मनात असुरक्षितेची भावना व अत्याचार वाढले आहे.ही विसंगती लक्ष वेधून घेत आहे. ही विसंगती दूर करणे आवश्यक आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात पुढे बोलताना डॉक्टर ढेरे म्हणाल्या, पूर्वीच्या काळी महिलांना अनेक बंधनात अडकवून ठेवण्यात आले होते. त्यांना बोलण्याचा घराबाहेर पडण्याचा अधिकार नव्हता.अशा काळात महिलांना आपली दुःखे साहित्यातून प्रकट केले. इतिहासात बायकांच्या जगण्याच्या नोंदणी आढळत नाहीत. मात्र लोकवाङ्मयात स्त्रियांच्या वेदनांची प्रचिती दिसून येते. त्याकाळी अक्षरज्ञान नसलेल्या स्त्रिया बुद्धिमान होत्या.
प्रारंभी आप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून संमेलनाची सुरुवात करण्यात आली.
मराठी विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थ्यांनी “हीच आमुची प्रार्थना हेच आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसासारखे वागने “” स्वागत गीत आणि ईशस्तवन सादर केले.प्रास्तविक डी बी पाटील यांनी केले. स्वागताध्यक्ष परिषदेचे अध्यक्ष ॲड सुधिर चव्हाण यांनी केले.