बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक निगराणी ठेवण्यात येत असून ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवर कसून तपासणी केली जात आहे.
आज बेळगाव शहरात मार्केट पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत १३ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. दुचाकीच्या डिक्कीमधून घेऊन जाण्यात येत असलेल्या रकमेची माहिती मिळताच फोर्ट रोड नजीक असलेल्या पिंपळकट्टा चेकपोस्ट नजीक हि कारवाई करण्यात आली आहे.
पिरनवाडी चेकपोस्ट वर २.८९ लाखांची रोकड जप्त
बेळगाव, येथील पिरनवाडी चेकपोस्टवर भरारी पथकाच्या पथकाने बुधवारी 2.89 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चेकपोस्टवरून जाणाऱ्या इंडिका वाहनाला पोलिस आणि एफएसटीने अडवले.
पथकातील अधिकाऱ्यांच्या तपासणीदरम्यान रोख रक्कम सापडली. ही रोकड तिजोरीत जमा होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.