Friday, January 3, 2025

/

बेळगाव येथे ड्रोन्स, ईव्हीएस निर्मित जागतिक केंद्राची घोषणा

 belgaum

बेळगावचे ड्रोन्स आणि इलेक्ट्रिक वाहने (ईव्हीएस) निर्मिती करणाऱ्या जागतिक केंद्रात रूपांतर करण्याचे धाडसी पाऊल कर्नाटक सरकारने उचलले आहे. तसेच त्याच्या साध्यतेसाठी सरकारने 500 एकर जमीन समर्पित केली आहे. तसेच यासाठी कर्नाटक डिजिटल इकॉनोमी मिशनच्या (केडीईएम) नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांच्या पहिल्या तुकडीला आज शुक्रवारी करारबद्ध केले जाणार आहे.

हे नवे तंत्रज्ञान केंद्र स्थापन करण्याच्या डीआरओइव्ही-23 या कार्यक्रमात उद्योगपती, नीती रचनाकार, संशोधन आणि विकास समुदाय तसेच विविध स्टार्टप्स अशा 200 भागधारकांचा समावेश आहे. राज्य सरकारने घेतलेला हा पुढाकार म्हणजे येत्या 2026 पर्यंत जागतिक डिजिटल नकाशावर राज्यभरातील तंत्रज्ञान क्लस्टर्स उदयास यावीत यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

ड्रॉन्स आणि ईव्हीएस निर्मिती करण्याच्या बाबतीत बेळगाव अथपासून इथपर्यंत संपूर्णपणे सक्षम आहे. येथील बऱ्याच स्टार्टप्सने यापूर्वीच प्रोटोटाइप्स विकसित केले असून त्यांच्या उत्पादनांची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे केडीइएमकडून ईव्हीएस आणि ड्रोनच्या निर्मितीसाठी बेळगावची निवड करण्यात आली आहे.

बेळगाव हे आधीच 16,228 नोंदणीकृत अतिसूक्ष्म (मायक्रो), लघु आणि मध्यम उद्योगांचे माहेरघर आहे. याखेरीज येथे 250 स्टार्टप्स असून यापैकी बहुतांश स्टार्टप्स हे घटक उत्पादक आहेत. आता बेळगाव शहर ड्रोन्स आणि इलेक्ट्रिक वाहन निर्मितीचे जागतिक केंद्र बनण्यासाठी सज्ज होत असून यासाठी सरकार, औद्योगिक क्षेत्र आणि संशोधन संस्था यांचा सहभाग असलेल्या आदर्श भागीदारीला धन्यवाद द्यावयास हवेत.Drones

हा रोमांचकारक विकास औद्योगिक क्षेत्रातील सर्वोत्तम विचारांना एकत्रित आणून नवीनता आणि वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करणार आहे. प्रत्येक भागीदार एकमेकांच्या शक्तीचा फायदा घेत बेळगावला जागतिक दर्जाचे क्लस्टर बनवून जगभरातील गुंतवणूकदार, प्रतिभा -कौशल्य आणि ग्राहकांना आकर्षित करू शकणार आहेत. यामध्ये सरकारचा पाठिंबा महत्त्वाची भूमिका बजावणारा असून आवश्यक पायाभूत सुविधा, धोरण आणि प्रोत्साहन देण्याद्वारे या नव्या उद्योगाच्या भरभराटीसाठी ते कायम सज्ज राहणार आहे.

एकंदर संघटितपणे बेळगाव दोलायमान पर्यावरण निर्माण करेल, ज्याचा फायदा फक्त स्थानिक अर्थ व्यवस्थेलाच नाही तर शाश्वत भविष्यासाठी केल्या जाणाऱ्या जागतिक प्रयत्नांमध्ये देखील त्याचे योगदान असेल. आता बेळगावसाठी एक नवे रोमांचकारी औद्योगिकद्वार खुले होत असल्यामुळे शक्यता अनंत आहेत हे मात्र निश्चित आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.