जितो लेडीज विंग बेळगाव यांच्यातर्फे जितो युथ व जितो बेळगाव यांच्या सहकार्याने यंदा पहिल्यांदाच एकात्मता, शांती, माणुसकी, अहिंसा आणि 100 टक्के मतदानासाठी येत्या रविवार दि. 2 एप्रिल 2023 रोजी म्हणजे श्री महावीर जयंतीच्या आदल्या दिवशी भव्य आयआयएफएल जितो ‘अहिंसा धाव’ (रन) या क्रीडा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
अहिंसा हा शब्द म्हटला की आपल्या मनात क्षमाशीलता, सकारात्मकता, वैश्विक प्रेम, ताकद, बंधुत्व आदींचे विचार येतात. अहिंसा ही एक शक्ती आहे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण सर्वांनी एकत्र येऊन आपली शक्ती दाखविण्याची गरज आहे. त्यासाठी श्री महावीर जयंतीच्या आदल्या दिवसापेक्षा चांगला दिवस कोणता असू शकतो.
यासाठीच बेळगावच्या जीतो परिवाराने 2 एप्रिल 2023 हा दिवस अहिंसा धाव अर्थात आयआयएफएल जितो ‘अहिंसा रन’ साठी निवडला आहे. अहिंसा रनचा हा उपक्रम 3 कि.मी., 5 कि.मी. आणि 10 कि.मी. अशा तीन गटात घेतला जाणार आहे. बेळगावचे माजी राष्ट्रीय फुटबॉलपटू, ट्रिपल सुपर रँडोनर व आयर्न मॅन 70.3 गोवा रोहन हरगुडे हे या अहिंसा रनचे ‘रेस ॲम्बेसिडर’ असणार आहेत.
युद्ध, तिरस्कार वगैरे गोष्टींना तिरांजली देऊन चांगले सुंदर जग निर्माण व्हावे. आपल्या सभोवतालची अहिंसा नाहीसे होऊन सर्वत्र शांतता नांदावी या प्रमुख उद्देशाने या अहिंसा रनचे आयोजन करण्यात आले आहे. तेंव्हा चला आपण सर्वांनी एकत्र येऊन या जगाला चांगली जागा बनवूया आणि हे फक्त आपल्याला ‘तू आणि मी’ असे म्हणत करता येणे शक्य आहे.
तर मग चला आपण सर्वांनी धावूया आणि आपल्या युवा पिढीसाठी एकात्मता, अहिंसा, प्रेम, आदर आणि शांती याचे एक उदाहरण घालून देऊया. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त सहभागाद्वारे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करूया. चांगला बदल आणि चांगले भविष्य निर्माण करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊया!
तेंव्हा तुम्हाला धावता येत नसेल तरी हरकत नाही, ज्या कारणासाठी या उपक्रमाचे आयोजन केले आहे ते लक्षात घेऊन चालत का होईना आपण आपल्या परिवार आणि मित्रमंडळींसह या उपक्रमात सहभागी व्हा, असे आवाहन जितो लेडीज विंगतर्फे करण्यात आले आहे. तसेच https://registrations.indiarunning.com/ahimsa-run-belgaum या ठिकाणी नाव नोंदणी करावी, असे कळविण्यात आले आहे.
फेसबुक https://www.facebook.com/jitoladieswingofficial/
इंस्टाग्राम https://www.instagram.com/jitoladieswingofficial/