कर दात्यांच्या सोयीसाठी, त्यांना आणखी थोडा कालावधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने आधार कार्डला पॅन कार्ड नंबर लिंक करण्याची मुदत येत्या 30 जून 2023 पर्यंत वाढवण्यात आली आली आहे. याबाबतची जाहीर सूचना स्वतंत्रपणे जारी केली जाईल.
आयकर कायदा 1961 अंतर्गत तरतुदीनुसार ज्या व्यक्तींना 1 जुलै 2017 रोजी पॅन कार्ड अदा करण्यात आले आणि जे आधार कार्ड मिळवण्यासाठी पात्र आहेत, त्यांनी विहित शुल्क अदा करून 31 मार्च 2023 रोजी किंवा तत्पूर्वी आपले आधार कार्ड विहित अधिकाऱ्यांकडून ताब्यात घ्यायचे आहे.
संबंधितांनी असे न केल्यास त्यांना त्याच्या परिणामांना सामोरे जावे लागेल. करदात्यांच्या सोयीसाठी आता आधार कार्डला पॅन कार्ड नंबर लिंक करण्याची अंतिम मुदत 31 मार्च ऐवजी 30 जून 2023 अशी वाढविण्यात आली आहे.
अत्यावश्यक असताना देखील येत्या 1 जुलै 2023 पासून आधार कार्डला लिंक न झालेल्या कर दात्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होतील. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यामुळे करदात्यांना पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल. 1) अशा पॅन कार्डवर कोणताही परतावा मिळणार नाही, 2) ज्या कालावधीत पॅन कार्ड निष्क्रिय होते त्या कालावधीतील अशा परताव्यावरील व्याज देय नसेल.
3) त्याचप्रमाणे टीडीएस आणि टीसीएस कापला जाईल / कायद्यातील तरतुदीनुसार उच्च दराने तो जमा केला जाईल. करदात्याला आपले पॅन कार्ड 30 दिवसात पुन्हा सक्रिय करता येईल. मात्र त्यासाठी 1000 रुपये शुल्क भरावे लागेल. ज्याना पॅन -आधार लिंकिंग मधून वगळण्यात आले आहे ते उपरोक्त परिणामांना पात्र नसतील. या श्रेणीमध्ये निर्दिष्ट राज्यात राहणारे लोक, कायद्यानुसार बिगर रहिवासी लोक, भारताचे नागरिकत्व नसलेले लोक किंवा वय वर्ष 80 किंवा पुढील वर्षभरात 80 वर्ष लागणारी मंडळी यांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आजतागायत 51 कोटी पॅन कार्ड नंबर आधार कार्डशी लिंक झाले आहेत. आधार कार्डला पॅन कार्ड नंबर लिंक करण्यासाठी नागरिकांनी https://eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/bl-link-aadhaar या लिंकचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.