बेळगाव लाईव्ह : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांसाठी कोट्यवधीची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रासह क्रीडापटूंना अच्छे दिन येणार असल्याचे मत स्वप्नील जाधव याने व्यक्त केले आहे.
अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार भारतीय क्रीडा मंत्रालयाचा विचार करता, केंद्र सरकारने खेलो इंडियासाठीचं बजेटही मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे. अर्थसंकल्पात तब्बल 3 हजार 389 कोटी रुपयांचं बजेट क्रीडा क्षेत्रासाठी दिलं असून मागील वर्षीच्या तुलनेत यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये खेळांना चालना देण्यासाठी 15 कोटींची तरतूद करण्यात आल्याने मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय खेळाडू विविध खेळांमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. क्रिकेटशिवाय आता विविध ऑलिम्पिक खेळांमध्येही भारत चांगली कामगिरी करत असून टोकियो ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स 2022 अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताने अफलातून कामगिरी केली आहे.
यामुळे आता क्रीडा क्षेत्राला पुन्हा चालना देण्याच्या दृष्टीने व पुढील होणाऱ्या आशिया व ऑलम्पिक स्पर्धेला लक्ष्य करत भारत सरकारने यंदाच्या बजेटमध्ये क्रीडा जगताचं बजेट जवळपास 400 कोटींनी वाढवलं आहे.
- 2022-23 चा विचार करता क्रीडा मंत्रालयाचं बजेट 2 हजार 671 होतं. पण आता 2023-24 साठी हे बजेट 3 हजार 389 कोटी इतकं करण्यात आलं आहे.
- मोदी सरकारने जवळपास 400 कोटींची वाढ केली आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये खेळांना आणखी चालना देण्याकरताही 15 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याचप्रमाणे केंद्र सरकारने राष्ट्रीय क्रीडा विश्वविद्यालयासाठी 107 कोटींची तरतूद केली आहे. यामुळे अनेक क्रीडापटूंना भरपूर सहकार्य मिळणार आहे.