रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्या सहकार्याने येत्या रविवार दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी जयभारत फाउंडेशन पुरस्कृत 12 व्या रोटरी बेळगाव भव्य अर्ध मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.
रोटरी क्लब ऑफ वेणूग्राम बेळगाव यांच्यातर्फे अर्ध मॅरेथॉन शर्यत आयोजित करण्याचे हे 12 वे वर्ष असून गेल्या 2008 सालापासून ही शर्यत आयोजित केली जाते. सुपर रँडोनर (ट्रिपल एसआर 2021 -22) आणि आयर्न मॅन 70.3 गोवा (2022) ट्रायथलीट रोहन हरगुडे हे यंदाच्या या शर्यतीचे ‘रेस ॲम्बेसिडर’ असणार आहेत हे विशेष होय. खडतर सुपर रँडोनर आणि आयर्न मॅन शर्यत पूर्ण करणारे रोहन हरगुडे हे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉलमध्ये कर्नाटक राज्याच्या संघाचे प्रतिनिधित्व देखील केले आहे. जय भारत फाउंडेशनचा पाठिंबा व अशोक आयर्न ग्रुपच्या पुढाकाराने आयोजित या अर्ध मॅरेथॉन शर्यतीची थीम ‘अवयव दान जागरूकता’ ही आहे. सीपीएड कॉलेज मैदान येथून सुरू होणारी सदर शर्यत विविध चार प्रकारात घेतली जाणार आहे.
मुख्य अर्ध मॅरेथॉन ही 21.095 की. मी. अंतराची असणार आहे. याव्यतिरिक्त 10, 5 आणि 3 कि. मी. अंतराच्या शर्यती 26 फेब्रुवारी रोजी आयोजित केल्या आहेत. या शर्यती 16-34 वर्षे, 35-49 वर्षे, 50 वर्षे आणि 50 वर्षावरील अशा वयोगटात घेतल्या जाणार आहेत. यापैकी 3 कि.मी. अंतराची शर्यत ही फन /रन वॉक असणार आहे.
सदर शर्यतींमधील विजेत्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत. याखेरीज सर्व धावपटूंना सुंदर डिझाइन केलेली पदके देण्याबरोबरच शर्यतीनंतर नाश्ता, उच्च दर्जाचा टी-शर्ट, शर्यतीदरम्यान हायड्रेशन सपोर्ट आणि बरेच कांही उपलब्ध केले जाणार आहे. रन इंडिया वेबसाइटवर (https://www.runindia.in/online/guest/MTg1) येत्या 22 फेब्रुवारीपर्यंत 10 टक्के अर्ली बर्ड डिस्काउंट ऑफरसह सदर शर्यतीसाठी नोंदणी सुरू झाली आहे. तरी हौशी धावपटूंनी या संधीचा लाभ घेत सामाजिक कारणाच्या समर्थनार्थ बेळगावातील सर्वात जुन्या ‘अवयव दान जागरूकता’ ही थीम असलेल्या सदर अर्ध मॅरेथॉनचा भाग होण्याची संधी गमावू नये, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
Fhhv
For running