अमृत भारत योजनेअंतर्गत नैऋत्य रेल्वेच्या बेळगावसह 52 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणारा असून त्यासंबंधीची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पुनर्विकास केल्या जाणाऱ्या रेल्वेस्थानकांमध्ये हुबळी विभागातील 16 बेंगळूरमधील 19 व म्हैसूर विभागातील 16 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
अमृत भारत योजनेअंतर्गत नैऋत्य रेल्वेच्या हुबळी विभागातील बेळगाव वास्को-द-गामा हुबळी बळणारी धारवाड होस्पेट विजापूर गदग बागलकोट घटप्रभा अलमट्टी मुनिराबाद बदामी अळणावर गोकाक रोड सनवोर्डेंम या रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे यापैकी सध्या काही स्थानकांचा विकास सुरू आहे.
प्रत्येक सामान्य रेल्वे प्रवाशाला जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा केंद्राचा उद्देश असून त्या अनुषंगाने सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे.
अमृत भारती योजना हे रेल्वे स्थानकांच्या मोठ्या विकासाचे धोरण आहे ज्याचा उद्देश प्रवाशांची हालचाल सुलभ करणे आणि स्थानकाच्या आसपासच्या परिसराचे एकत्रीकरण हे आहे.
रेल्वे स्थानकाचे एकंदर स्वरूप सुधारण्यासाठी वास्तुशास्त्रीय नियोजनाला महत्त्व दिले जाणार आहे. या पुनर्विकासाद्वारे विश्रांती, व्यवसाय, रिटेल आउट लेट्स इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.