Thursday, December 19, 2024

/

हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

 belgaum

शहापूर येथील रहिवासी गीता भरमा कोळेकर या 37 वर्षीय मध्यमवर्गीय विवाहितेच्या जीविताच्या हितासाठी तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) शस्त्रक्रियेची अत्यंत गरज असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

गीता भरमा कोळेकर यांना खुल्या हृदय शस्त्रक्रियेसाठी (ओपन हार्ट सर्जरी) आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांचे पती भरमा कोळेकर हे एका मध्यमवर्गीय कुटुंबातील असून हिंदी विषयात त्यांनी मास्टर्स डिग्री संपादन केली आहे. एक दिवस मित्राच्या घरी गेले असता त्यांना एका मुलीला हृदयाची समस्या असल्याची माहिती मिळाली.

तेंव्हा त्यांनी लागलीच त्या मुलीची म्हणजे गीता यांची भेट घेतली आणि पहिल्या नजरेतच ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. भरमा यानी लागलीच गीताशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी डॉक्टरांनी या जोडप्याला गीताच्या बाबतीत हृदयाशी संबंधित मोठी वैद्यकीय समस्या असल्यामुळे त्यांना मूलं होऊ शकत नाही असे सांगितले. मात्र निराश न होता भरमा व गीता यांनी एका मुलाला दत्तक घेऊन त्याचे नांव कृष्णा ठेवले आहे.

त्यानंतर गेल्या जानेवारी 2023 मध्ये गीताची प्रकृती अचानक गंभीरपणे बिघडली. अलीकडेच तिने शिक्षिका म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली होती. मात्र आरोग्याच्या समस्येमुळे नाईलाजाने तिला ती नोकरी सोडावी लागली आहे.Heart sergery

सध्या भरमा कोळेकर हे एका खाजगी महाविद्यालयामध्ये हंगामी व्याख्याते म्हणून काम करत आहेत. डॉक्टरांनी गीताचा जीव वाचवावयाचा असेल तर तिच्यावर रिडो टीव्ही रिप्लेसमेंट (ओपन हार्ट सर्जरी) ही शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे. ही शस्त्रक्रिया दीक्षित हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडच्या अरिहंत हॉस्पिटलमध्ये होणार आहे. सदर शस्त्रक्रियेसाठी सुमारे 5 लाख 50 हजार रुपये इतका खर्च येणार आहे. महाविद्यालयात हंगामी व्याख्याते म्हणून काम करणाऱ्या भरमा यांचा पगार जेमतेम आहे. त्यांच्यासाठी शस्त्रक्रियेचा हा खर्च आवाक्या बाहेरील आहे.

आपल्या पत्नीचा जीव वाचवण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करत असले तरी त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. तरी शहरवासीयांसह सेवाभावी संघ संस्थां आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन गीता कोळेकर यांचा जीव वाचवण्यासाठी शक्य होईल तितके आर्थिक सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधितांनी आपले सहाय्य पुढील खात्यावर जमा करावे. खातेदार -भरमा कोळेकर, बँकेचे नांव -बँक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक -60252353122, आयएफएससी कोड -एमएएचबी0000159, बँक शाखा -टिळकवाडी बेळगाव, फोन पे -8123624450.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.