छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे आणि किल्ले राजहंसगड विकास कामांच्या उद्घाटना वरून भाजप आणि काँग्रेस मध्ये श्रेयवादा वरून राजकारण सुरू असताना ग्रामस्थ आणि पंच मंडळीनी बैठक घेत मोठा निर्णय घेत ठराव केला.
राजहंस गड येथील ग्रामस्थांनी बैठक घेत राजहंसगड देवस्थान कमिटी व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन विकास कामे आणि छ्त्रपती शिवरायांच्या मूर्तीचे उद्घाटन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
सिध्देश्वर मंदिरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्री सिध्देश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रामचंद्र गडकरी होते. या बैठकीत गावकरी आणि स्थानिक लोकांना विश्वासात न घेता मीडियात उद्घाटन कार्यक्रम ठरवण्यात आला आहे.सिध्देश्वर देवस्थान हे राजहंस गड गावचे ग्राम दैवत आहे आज पर्यंत गाव कमिटी आणि सिध्देश्वर देवस्थान कमिटीला विश्वासात घेऊन गडावरील कोणतेही काम करण्यात आले आहे यापुढे मंदिर ट्रस्ट कमिटी,पंच कमिटी आणि ग्रामस्थांना विश्वासात घेऊन करावे अशी मागणी होत आहे.
गुढी पाडवा दसरा आणि श्रावण सोमवार हे सण राजहंस गडाचे ग्रामस्थ किल्ल्यावर साजरे करत आले आहेत.गावकऱ्यांनी स्वतः मेहनत घेत गडावरील सिध्देश्वर मंदिर उभारले आहे अशीही बैठकीत चर्चा करण्यात आली.
यापुढे गडावर कोणतेही कार्यक्रम अथवा विकास कामांचे उद्घाटन करायचे अधिकार मंदिर ट्रस्ट कमिटीला द्यावे अशीही मागणी करण्यात आली. बैठकीतील ठरावास बाळू इंगळे,सिधाप्पा पवार,लक्ष्मण भोगण,लक्ष्मण थोरवत,संदीप मोरे, गणु हावळ, शिवपुत्रप्पा बर्लीकट्टी,विनोद रेडेकर रामा इंगळे आदींच्या सह्या आहेत