बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय महिला दिनानिमित्त बेळगावमधील मराठा मंडळ संचलित, नाथजीराव हलगेकर दंत विज्ञान आणि संशोधन केंद्रात महिला तक्रार कक्ष आणि जेंडर सेन्सिटिव्हिटी सेलचे उद्घाटन करण्यात आले. याचप्रमाणे मिम्स स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे प्राचार्य डॉ.रमाकांत नायक, प्रमुख अतिथी आणि प्रशासकीय प्रभारी डॉ. पुष्पा पी., शैक्षणिक प्रभारी डॉ. वीरेंद्र उप्पिन आणि महिला सेलच्या प्रभारी डॉ. शीतल सानिकोप यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्राध्यापिका डॉ. शीतल सानिकोप यांनी स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हस्तकलेसंदर्भात त्यांनी माहिती दिली.
या कार्यक्रमास जेएनएमसीमधील मायक्रोबायोलॉजी विभागाच्या प्राध्यापिका डॉ. ज्योती नागमोती आणि दत्तांश एडटेक एलएलपी बेळगावच्या सीईओ चेतना सारंग या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. ‘डिजिटल युगातील महिलांचे सक्षमीकरण’ आणि ‘जेंडर आर्टिफिशियल इंटेलिजन्सला मदत करण्यासाठी लैंगिक रूढी कमी करणे’ या दोन विषयांवर उभयतांनी विचार व्यक्त केले.
यावेळी ‘डिजिटॉल इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी फॉर जेंडर इक्वॅलिटी’ या थीमवर आधारित मिम्स स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत इंटर्नच्या पदवीधरांनी सहभाग घेत उत्कृष्ट सादरीकरण केले. दंत विज्ञान आणि संशोधन केंद्राची सांस्कृतिक प्रभारी विद्यार्थिनी मेहल आंगणे हिने आभार मानले.