Monday, November 18, 2024

/

बेळगाव रेल्वे स्टेशन उद्या पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण

 belgaum

तब्बल सुमारे 200 कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेल्या शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या भव्य हायटेक बेळगाव रेल्वे स्टेशनचा लोकार्पण सोहळा दिवंगत रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या इच्छेनुसार उद्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळातील बेळगाव रेल्वे स्टेशनची इमारत जीर्ण झाल्याने आणि रेल्वे वाहतुकीची वर्दळ वाढल्याने सदर रेल्वे स्टेशनचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर या रेल्वेस्थानकाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ गेल्या 2018 मध्ये तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते पार पडला होता.

त्यानंतर मध्यंतरीच्या काळात कोरोना प्रादुर्भावामुळे रेल्वे स्थानकाचे विकास काम थांबले होते. दरम्यानच्या काळात मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी खासदार मंगला अंगडी यांच्या पुढाकाराने बेळगाव रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्याचे काम पुन्हा जोमाने सुरू झाले.

आता बेळगाव रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून एखाद्या विमानतळाच्या इमारतीप्रमाणे भासणारी दोन्ही बाजूला प्रशस्त प्रवेशद्वारे असणारी रेल्वे स्टेशनची भव्य वास्तू बांधण्यात आली आहे. नूतन हायटेक बेळगाव रेल्वे स्टेशनची इमारत चार मजली असून यामध्ये फुड कोर्ट, शॉपिंग मॉल, लिफ्ट, स्टेशन बाहेर चार चाकी आणि दुचाकी वाहनांसाठी पार्किंग वगैरे सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या नव्या रेल्वे स्टेशनमधून आता अनेक नव्या रेल्वे सेवा सुरू होणार आहेत.Railway station

रेल्वे गाड्यांची स्वच्छता आणि दुरुस्तीचे केंद्र या ठिकाणी असणार आहे. नव्या रेल्वे स्थानकावर चार प्लॅटफॉर्म असून स्टेशनच्या उत्तर आणि दक्षिणेकडील बाजूस प्रवेशद्वार करण्यात आली आहेत.

सदर रेल्वे स्टेशनच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया व्यक्त करताना ‘या रेल्वे स्टेशनचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्यामुळे कै. सुरेश अंगडी यांचे स्वप्न साकार होत आहे, याचे मला समाधान आहे. त्यामुळे बेळगावच्या वैभवात भर पडणार आहे. उत्तर कर्नाटकातील रेल्वे स्टेशनची भव्य इमारत आता बेळगाव साकारली आहे, असे खासदार मंगल अंगडी म्हणाल्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.