Sunday, January 26, 2025

/

कसा भरावा रहदारी नियम भंगाचा ऑनलाइन दंड

 belgaum

बेळगाव शहरात वाहतूक नियम भंगाचा दंड भरण्याची डोकेदुखी आता बंद झाली असून नागरिकांना हा दंड आता ऑनलाईन तसेच कर्नाटक वन वेबसाईटच्या माध्यमातून भरता येणार आहे.

रहदारी नियम भंगासंदर्भातील मोठ्या संख्येने प्रलंबित असलेले गुन्हे निकालात काढण्यासाठी एक उदार प्रयत्न करताना कर्नाटक परिवहन खात्याने प्रलंबित चलनांच्या दंड वसुलीत 50 टक्के सूट देण्याची ‘वन टाईम ऑफर’ जाहीर केली असून वाहतूक नियम भंग करणारे जे लोक 11 फेब्रुवारीपर्यंत दंड भरतील त्यांनाच ही ऑफर लागू असणार आहे.

पोलीस ठाण्यात न जाता दंड भरता येणार असल्यामुळे ज्यांना या ऑफरचा लाभ घ्यावयाचा आहे ते कर्नाटक वन वेबसाईटला भेट देऊन किती दंड भरायचा हे तपासून ऑनलाइन दंड भरू शकतात. ऑनलाईन दंड भरण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे.

 belgaum

प्रथम https://www.karnatakaone.gov.in/PortalHome/ServiceList या ठिकाणी जाऊन ट्रॅफिक पोलीस व्हायोलेशन फाईन वर क्लिक करावे. त्यानंतर आपला व्हेईकल रजिस्ट्रेशन नंबर एंटर करून आय एम नॉट अ रोबोट या बॉक्सवर क्लिक करावे.

त्यानंतर सर्च बटन दाबून स्क्रोल करण्याद्वारे संबंधित नंबर समोर कोणत्या रहदारी नियमाचे उल्लंघन झाले ते नमूद केलेले पहावयास मिळेल. ते पाहून इच्छा असल्यास आपण दंड भरावा. याखेरीज वाहनचालक अथवा मालक शहरातील बेळगाव वन सेंटरला भेट देऊन आपला दंड भरू शकतात.

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.