बेळगाव लाईव्ह : विकासाच्या नावावरून येळ्ळूर राजहंसगडासंदर्भात राजकारण्यांमध्ये जरी हमारी-तुमरी सुरु असली तरी गडाच्या सौंदर्याची भुरळ मात्र विदेशी पर्यटकांमध्ये पाहायला मिळाली.
कामानिमित्त बेळगावमध्ये आलेल्या फ्रान्सच्या पर्यटकांनी आज राजहंसगड किल्ल्याला भेट दिली. संपूर्ण गड परिसर फिरून पाहिल्यानंतर त्यांनी ‘बेळगाव लाईव्ह’ला प्रतिक्रिया दिली.
त्यांच्यासमवेत आलेल्या चेतन आनंद यांनी ‘बेळगाव लाईव्ह’शी बोलताना सांगितले, कि बेळगावमधील राजहंसगडाचा विकास होत असलेला पाहून आपल्याला आनंद होत आहे. पर्यटन स्थळाच्या धर्तीवर या गडाचा विकास होत असून याठिकाणी येऊन आपल्याला समाधान वाटले, बेळगावकरांसाठी हि बाब नक्कीच समाधानकारक असेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
कामानिमित्ताने आलेल्या फ्रान्सच्या पर्यटकांना राजहंसगडाच्या सौंदर्याची भुरळ पडली. यावेळी राजहंसगडाचे या पर्यटकांनी कौतुक केले.
रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली आजपासून शिवसन्मान पदयात्रेला सुरुवात झाली असून आजचा यात्रेचा पहिला दिवस आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी येळ्ळूरवासीयांसह विदेशी पर्यटकांनीही शिवसन्मान यात्रेला शुभेच्छा दिल्या.