विमल फाउंडेशन माध्यमातून बेळगाव शहरातील शाळा कॉलेजमधून आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला शाळांमध्ये घेण्यास मज्जाव केल्याने भाजप नेते किरण जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.चित्रकला स्पर्धेच्या आडून अधिकाऱ्यांना आदेश देण्यास भाग पाडणाऱ्या कृतीचा निषेध व्यक्त करत या विरोधात शहर गट शिक्षण अधिकाऱ्याला जाब विचारणार आणि याची तक्रार थेट मुख्यमंत्र्याना करणार असल्याचे किरण जाधव यांनी म्हटले आहे.
रविवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधताना चित्रकला स्पर्धेत राजकारण केल्याचा आरोप करत बीईओनी अचानकपणे स्पर्धा शाळांमधून घेऊ नये असा आदेश बजावला त्यामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उपक्रमाचे नुकसान झाले आहे असे म्हंटले.बेळगाव शहरातील 78 शाळा मधून या स्पर्धेचे आयोजन केले होते सकाळी 9 वाजता एकच वेळी ही स्पर्धा विविध शाळातून घेण्यात येणार होती यासाठी आमच्या विमल फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सर्व शाळा चित्रकला स्पर्धेची सामुग्री वितरीत केली होती रविवारी सकलीसदर स्पर्धा घेतल्यास कारवाई केली जाईल असा आदेश बी ई कार्यालयातून बजावण्यात आला त्यामुळे घाबरून शाळा प्रशासनाने स्पर्धा थांबवली आहे गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ज्या लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली येऊन हा आदेश बजावला आहे त्यांना जाब विचारणार आहोत असेही किरण जाधव यांनी सांगितले.
सर्व शाळा कॉलेज प्रशासनाला विश्वासात घेऊन या स्पर्धेचे आयोजन केले होते या आयोजनात कोणतेही राजकारण नव्हते विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देणे हा आमचा उद्देश होता.जवळपास दीड लाख मुलांनी नाव नोंदणी केली होती तर 78 हजार हून अधिक मुले यात सहभागी होणार होती मात्र अचानक बी ई ओ यांनी आदेश काढल्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.
स्पर्धेच्या माध्यमातून आपण कोणतेही राजकारण करत नसून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठीचं स्पर्धा आयोजित केली असल्याचे म्हंटले आहे मात्र अचानक स्पर्धा रद्द झाल्याने बेळगावातील सुज्ञ जनता पालक आणि विद्यार्थ्यांना याचे मागे कुणी आहे ते नक्कीच कळेल असेही त्यांनी म्हटले आहे.
विद्यार्थ्यांचा कला गुणांना वाव देण्यासाठी घेण्यात आलेली स्पर्धा ही अचानक रद्द करण्यास भाग पाडल्याने पालकांच्यात आणि विद्यार्थ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे बेळगावच्या राजकारणाची पातळी इतक्या खालच्या दर्जाचा घसरली आहे याबद्दल पालक वर्गात चर्चा रंगली होती.वेळोवेळी दुसऱ्याच्या कार्यक्रमात खो घालणाऱ्या त्या नेत्या बाबत संताप व्यक्त होत होता.सर्वपक्षीया कडूनच बेळगावात अशी साठमारी होत असेल तर मराठी भाषिक बेळगावात काय परिस्थितीला तोंड देत असतील याची कल्पना करायला हवी! मराठी माणसांच्या अनेक साहित्य संमेलनावर आणि सांस्कृतिक कार्यक्रमावर नियंत्रण आणण्याचे काम कर्नाटकी नेत्यांनी केल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.
आजच्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन किरण जाधव यांचे नाव सध्या आमदारकीच्या रेस मध्ये मोठ्या प्रमाणात घेतल जात असल्याने या कार्यक्रमाला कुणी खो घातला असेल याचे राजकीय आडाखे बांधले जात आहेत.
‘आपल्या कामाचा माणूस’ अश्या बॅनर खाली किरण जाधव लोकांची कामे करण्यात व जनसंपर्क वाढवण्यात कमालीचे यशस्वी झाले आहेत या पोटतिडकीेतून सदर घटना घडली असल्याचे नागरिकांतून मत व्यक्त होत आहे.शेवटी बेळगाव हे कला क्रीडा शिक्षण यासाठी नावाजलेले शहर आहे या शहरात चित्रकलेला अश्या प्रकारे अडवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेला धक्का पोहोचला आहेच सांस्कृतिक दृष्ट्याही हानिकारक घटना घडली आहे.