सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समितीने येत्या मंगळवार दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी ‘चलो मुंबई’ हा नारा दिला आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी नांव नोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 28 फेब्रुवारी रोजीच्या मुंबई येथील आझाद मैदानावरील धरणे आंदोलनासाठी चलो मुंबईचा नारा देण्यात आला आहे. या धरणे आंदोलनात बेळगाव तालुक्यातील म. ए. समितीचे कार्यकर्ते, मराठी भाषिक, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या यापैकी ज्यांना ज्यांना सहभागी व्हायचे असेल,
त्यांनी आपली नांवे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कॉलेज रोड येथील (पवन हॉटेलच्या बाजूला) शिंदे बिल्डिंग कार्यालयात नोंदवावीत. कार्यकर्त्यांसाठी रेल्वेने जाण्याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी प्रत्येकी 700 रुपये व एक स्वतःचे आधार कार्ड झेरॉक्स देण्याचे आहे. तसेच ज्या कार्यकर्त्याना आपल्या स्वतःच्या वैयक्तिक वाहनातून जायचं असेल त्यांनीही आपली नावे व वाहन क्रमांक या कार्यालयात देण्याचे कळविण्यात आले आहे.
कार्यकर्त्यांची नांव नोंदणी व अन्य माहिती नोंद करून घेण्यासाठी तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस ॲड एम. जी पाटील (9448437141), दीपक पावशे (6363167121) आणि युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी (7847886025)
हे गुरुवार दि. 2 ते शुक्रवार दि. 10 फेब्रुवारी पर्यंत दुपारी 12 ते 3 या वेळेत कार्यालयात हजर असतील. तेंव्हा कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे नांवे नोंदवावी, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी म.म.ए.समितीतर्फे दि. 28 फेब्रुवारी रोजी मुंबई मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चात सहभागी होण्यासाठी रेल्वे, बस किंवा खाजगी वाहनांने येणा-या कार्यकर्त्यांनी आपली नावे दि. 10 तारखेपर्यंत नोंदवावीत.
रेल्वेसाठी 700 रूपये ( आधार कार्ड आवश्यक ), बससाठी 1100 रूपये भरावे लागतील. शुक्रवार दि 3 पासून दि . 10 तारखेपर्यंत सायंकाळी 6 ते 7 या वेळेत तर खाजगी वाहनांने येणा-यानी दि. 15 पर्यंत रामलिगखिड गल्ली येथील शहर म.ए.समितीच्या कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन शिवराज पाटील यांनी केले आहे.