Tuesday, January 14, 2025

/

कार -ट्रकच्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार

 belgaum

पादचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्नात भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटून कारने समोर जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्यामुळे घडलेल्या भीषण अपघातात बालकासह 5 जण जागीच ठार आणि चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास धारवाडनजीक पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घडली.

अपघातातील मृतांची नावे नागप्‍पा इराप्पा मुद्दोजी (वय 29), महांतेश बसाप्पा मुद्दोजी (वय 40, दोघे रा. अवरादी ता. कित्तूर), बसवराज शिवपुत्रप्पा नरगुंद (वय 35 रा. निच्चनकी), श्री कुमार नरगुंद (वय 5) आणि पादचारी ईरण्णा गुरुसिद्धप्पा रामनगौडर (वय 35 रा. हेब्बळ्ळी) अशी आहेत.

त्याचप्रमाणे गंभीर जखमी झालेल्यांमध्ये श्रवणकुमार बसवराज नरगुंद (वय 7), मडिवाळाप्पा राजू अळणावर (वय 23), प्रकाशगौडा शंकरगौडा पाटील (वय 22), मंजुनाथ महांतेश मुद्दोजी (वय 22) यांचा समावेश आहे त्यांच्यावर हुबळीतील किम्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, मंजुनाथ मुद्दोजी याची केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेअंतर्गत सैन्य दलात निवड झाल्यामुळे त्याला हुबळीला सोडण्यासाठी पादचारी वगळता उपरोक्त सर्वजण फियाट फिगो (क्र. केए 22 एन 9373) कार गाडीतून कित्तुरकडून हुबळीच्या दिशेने जात होते. त्यावेळी पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर धारवाडजवळ रस्त्यावर आडव्या आलेल्या पादचाऱ्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे कार वरील नियंत्रण सुटले.

परिणामी कारने समोर जाणाऱ्या ट्रकला (क्र. एमएच 09 ईएम 7589) मागून धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की कारच्या दर्शनीय भागाचा चेदामेंदा होऊन पादचाऱ्यासह कारमधील चौघेजण जागीच ठार झाले.

अपघातातून सैन्य दलात निवड झालेला मंजुनाथ मुद्दोजी सुदैवाने बचावला असला तरी त्याला गंभीर इजा झाली आहे. अपघातात ठार झालेला पादचारी ईरण्णा हा टेगूर जवळील मुल्ला धाबा येथे काम करीत होता. महामार्ग ओलांडताना अपघातात तो ठार झाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.