बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या तिसर्या रेल्वे गेटपासून गोवावेस बसवेश्वर सर्कलपर्यंत श्री. अटल बिहारी वाजपेयी मार्ग या रस्त्याच्या व्हाईट टॉपिंगचे काम हाती घेतले आहे.
याचप्रमाणे एल अँड टी कंपनीने शहराच्या 24x 7 पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचेही काम हाती घेतले आहे. या कामांना महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता असून सदर कामे पूर्ण होईपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करून या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावरून अन्यत्र वळविण्यात आली आहे.
१) तिसरे रेल्वे गेट ते श्री. अटल बिहारी वाजपेयी मार्गाने गोगटे सर्कल, चन्नम्मा सर्कल मार्गे जाणारी वाहने काँग्रेस रोडने गोगटे सर्कल मार्गे जातील.
२) श्री. अटल बिहारी वाजपेयी मार्गाने खानापूरच्या बाजूने अनगोळ, वडगाव, शहापूरकडे जाणाऱ्यांनी देसूर क्रॉसवरून येळ्ळूर रोडला उजव्या वळणावरून मार्गस्थ व्हावे. आणि चोर्ला, जांबोटी, पिरनवाडी मार्गे जाणारे बेमको क्रॉसजवळून उजव्या मार्गाने केएलई इंजिनियरिंग कॉलेज, चौथा रेल्वे गेट मार्गे अनगोळ मुख्य रस्त्यावरून पुढे मार्गस्थ होतील.
३) टिळकवडी परिसरातील सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ परिसरातील रहिवाशांनी बेळगाव शहरात प्रवेश घेण्यासाठी गोवावेस सर्कलमार्गे न जाता दुसऱ्या रेल्वेगेट मार्गे देशमुख रोड, शुक्रवार पेठ पहिले रेल्वे गेट मार्गे काँग्रेसरोड़ने पुढे जावे.
४) अनगोळा, भाग्य नगर, आदर्श नगर, हिंदवाडी परिसरातुन श्री अटल बिहारी वाजपेयी मार्गाने गोवावेस सर्कलकडे येणाऱ्या नागरिकांनी हिंदवाडी मेन रोडपासून डाक बांगला (कोरे गल्ली क्रॉस), शहापूर मार्गे गोवावेस येथून मार्गस्थ व्हावे.
या भागातील नागरिकांनी वाहतूक सेवेत झालेल्या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागाने केले आहे.