माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या येत्या सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी बी. एस. येडीयुरप्पा मार्गाशेजारील मालिनी सिटी येथे होणाऱ्या जाहीर सभेप्रसंगी हॅन्डबॅग, पाण्याच्या बाटल्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण आणण्यावर निर्बंध असणारा आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
हॅन्डबॅगा, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे सभेच्या ठिकाणी आणण्यास बंदी असणार आहे.
उपस्थित सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शुद्ध पिण्याचे पाणी सभेच्या ठिकाणीच पुरविले जाईल. बस किंवा इतर वाहनांनी सभेला उपस्थित राहण्यासाठी येणाऱ्यांनी आपल्या बॅगा, पाण्याच्या बाटल्या आणि इलेक्ट्रॉनिक उपकरण घरीच ठेवून यावीत.
तथापी मोबाईल फोन आणण्यास परवानगी असल्याचे स्पष्ट करण्याबरोबरच जनतेने सुरक्षा व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 फेब्रुवारी रोजी बेळगाव भेटीवर येणार असून यावेळी ते विविध विकास कामे आणि नव्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. या दिवशी आयोजित पंतप्रधानांच्या रोड शोचे अंतर सुमारे 8 कि. मी. इतके असणार आहे. पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सुमारे 3 लाख लोकांची उपस्थिती असेल, असा अंदाज आहे.