Tuesday, January 28, 2025

/

बेळगाव डेपोसाठी १०० बसेसची खरेदी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि ग्रामीण बससेवेवर अलीकडे ताण वाढला असून आता लवकरच हा ताण कमी करण्यासंदर्भात परिवहनने निर्णय घेतला आहे. बीएमटीसीने भंगारात काढलेल्या १०० बसेस बेळगाव परिवहन विभागाच्या ताफ्यात लवकरच दाखल होणार आहेत. येत्या महिनाभरात हि मागणी पूर्ण होणार असून आतापर्यंत ५० बसेस दाखल झाल्या आहेत. यामुळे शहर आणि ग्रामीण सेवेवर असलेला ताण कमी होण्याची चिन्हे आहेत.

मागील ३ वर्षांपासून एकही नवी बस बेळगाव परिवहन विभागाला मिळालेली नाही. सध्या बेळगाव परिवहन मंडळाला २०० बसेसची गरज आहे. २०२० मधील परिवहन कर्मचाऱ्यांचे आंदोलन, लॉकडाउनमुळे ठप्प झालेला महसूल, इंधन दरवाढ आदी कारणांमुळे परिवहन महामंडळाला दरवर्षी ३०० कोटी रुपयांहूनचा अधिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे नव्या बस खरेदीवर भर देण्यात आला नव्हता.

बेंगळुरू परिवहनने नुकत्याच १ हजार बसेस भंगारात काढल्या असून प्रत्येकी एक लाख रुपये याप्रमाणे वायव्य परिवहन महामंडळाकडून बसची खरेदी केली जात आहे. बीएमटीसीकडून भंगारात काढलेल्या बसचाच आधार परिवहन मंडळाला आहे.

 belgaum

पहिल्या टप्प्यात १०० बसेसची खरेदी झाली होती. यापैकी २५ बसेस वायव्य परिवहन महामंडळाने बेळगाव विभागाला दिल्या होत्या. त्यानंतर गेल्या महिनाभरात आणखी २५ बसेस बेळगाव विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. बीएमटीसीकडून खरेदी केलेल्या या जुन्या बसेसचा वापर केवळ शहर सेवेसाठी केला जात आहे.

बीएमटीसीमध्ये आठ ते नऊ लाख किलोमीटर धावलेल्या या जुन्या बसेस आहेत. या बसेसमध्ये सुधारणा करुन वायव्य परिवहन महामंडळाकडून त्या शहर सेवेसाठी वापरल्या जात आहेत. सध्या सुळेभावी, वडगाव, अनगोळ आदी मार्गावर या बसेस धावत आहेत. पुढील काही दिवसात १०० बसेस दाखल होणार असल्याने त्या शहराने ग्रामीण सेवेतील इतर मार्गावर धावतील आणि यामुळे शहर तसेच ग्रामीण बससेवेवरील ताणही कमी होईल.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.