Sunday, January 26, 2025

/

तालुक्यात होतेय महिलांचे एकत्रिकरण

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समिती आणि संबंधित संघ संस्थांच्या वतीने देखील महिलांचे एकत्रीकरण होत असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तालुक्यात ठिकठिकाणी महिलांचे कार्यक्रम महिला मेळावे हळदी कुंकू  विविध संघ संस्था पथ  संस्थांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडत आहेत.

राजमाता जिजाऊ महासाहेबांनी घालून दिलेला आदर्श आणि सावित्रीबाई फुले यांची शिकवण याच पावलावर आज महिला आपली वाटचाल करत असून त्यांचा आदर्श ठेवणे आज खूप गरजेचे आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांनी आज अग्रेसर राहून महिला स्वतंत्र आणि स्वावलंबी बनणे गरजेचे आहे हळदी कुंकू कुंकू या समारंभाच्या माध्यमातून महिलांना एकत्र करून त्याला स्वावलंबी आणि महिलांना आपल्या स्वाभिमानाची शिकवण देणे हा यामागचा हेतू आहे प्रत्येक महिलेने आपला स्वाभिमान ठेवला पाहिजे आपली मुलं आपला संसार याचबरोबर आपला स्वाभिमानी ठेवणे गरजेचे आज काळाची गरज आहे असे प्रतिपादन बालिका आदर्श शाळेच्या माजी मुख्याध्यापिका आशारतनजी यांनी बोलताना व्यक्त केले.

आंबेवाडी येथील भाग्यलक्ष्मी को ऑप सोसायटीच्या वतीने मराठी शाळेच्या पटांगणात आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. सुमन शिवाजी अतिवाडकर या होत्या.

 belgaum

यावेळी राजमाता जिजाऊंच्या फोटोचे पूजन आशारतनजी आणि प्रा. मधुरा गुरव यांच्या हस्ते करण्यात आले तर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सौ प्रीती आर चौगुले आणि माजी तालुका पंचायत सदस्या सौ कमल मनोळकर यांच्या हस्ते करण्यात आले तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन म. ए. समितीचे युवा नेते आर.एम चौगुले यांच्या हस्ते तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य डी. बी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रारंभी प्रास्ताविक आणि सोसायटीच्या कार्याविषयीची माहिती आणि दरवर्षी राबविण्यात येणारे कार्यक्रमाची सविस्तर माहिती सोसायटीचे चेअरमन आनंद तुडयेकर यांनी सांगितली.Ambewadi

यावेळी बोलताना मधुरा गुरव म्हणाल्या की प्रत्येक महिलेने स्वावलंबी आणि आपला मराठी बाणा जागृत ठेवणे आज काळाची गरज आहे. आज मराठ्यांचे वर्चस्व असताना सुद्धा काही लोक आपल्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि महिलांना छोटी मोठी आमिष दाखवून आमच्या महिलांना ती विकत घेण्याचा प्रयत्न करत आहे मात्र मराठी माणूस आज पर्यंत कधी त्यांना भीक घातलेलं नाहीये मराठी माणूस हा स्वावलंबी असून त्यांना कदापिही त्यांच्या भिकेला लक्ष देणार नाही मराठी माणूस आपला स्वाभिमान आपल्या आणि आपला बाणा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि या हळदीकुंकूच्या माध्यमातून प्रत्येक महिलांनी एकत्र येऊन आज ती शपथ घेणे काळाची गरज असल्याची त्यांनी यावेळी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार मांडले

यावेळी यावेळी आर एम चौगुले, डी बी पाटील गव्ह. कंत्राटदार शिवाजी अतिवाडकर यांनीही महिलांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला संस्थेच्या व्हा. चेअरमन प्रतिमा चौगुले संचालिका माधवी तरळे, संचालक यल्लापा इंचले, अनिल अतिवाडकर, गजानन घुगेटकर, सुभाष केदनुरकर, मल्लेश लोहार, संजय तरळे रुकमाण्णा कोवाडकर, अर्जुन कांबळे, आदी उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सर्व कर्मचारी वर्ग आणि सल्लागार यांनी विशेष प्रयत्न केले. त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश बेळगुंदकर यांनी केले तर आभार गजानन घुगेटकर यांनी मांडले या कार्यक्रमाला आंबेवाडी परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.